Google चं हे ऍप झालं आहे हॅक; वापरल्यास तुमचा फोनही पडू शकतो बंद

अनेक युझर्सनी याबाबतच्या तक्रारी देखील Google कडे केल्या आहेत. पण ते पूर्ववत कधी होईल याची कोणतीही माहिती अजून Google कडून देण्यात आलेली नाही

Representative Image (Photo: inquisitr)

गुगल ऍप्सवर हॅकर्सची कायमच नजर असते. कारण अनेक युझर्स Google वर लॉगइन करून आपली खाजगी माहिती देतात. पण आपली कोणती माहिती आपण Google वर लॉगइन करताना देत आहोत याची प्रत्येकाने काळजी बाळगणं बंधनकारक आहे. नाहीतर तुमच्या खाजगी माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो. नावाव्यतिरिक्त Google ला तुमचा पत्ता, मोबाईल नंबर, जन्म तारीख तसेच आवडी निवडी या सगळ्या गोष्टी माहित असतात.

आता मात्र तुम्हाला हे ऐकून नक्कीच धक्का बसेल की Google चं Google Assistant हे ऍप हॅक झालं असल्याचं सध्या बोललं जात आहे. अनेक युझर्सनी याबाबतच्या तक्रारी देखील Google कडे केल्या आहेत. पण ते पूर्ववत कधी होईल याची कोणतीही माहिती अजून Google कडून देण्यात आलेली नाही.

Alexa च्या माध्यमातून आता बिलाचे पैसे भरता येणार, जाणून घ्या कसे?

Google Assistant वापरल्यास फोन पडू शकतो बंद

Google Assistant हे ऍप वापरताच 'Hey Google' किंवा 'Ok Google' असं बोलताच काहींच्या फोनची स्क्रीन अचानक फ्रीझ झाली आहे. कितीही प्रयत्न केले तरी स्क्रीन बंद होत नसल्याची तक्रार अनेक युझर्सनी Google कडे केली आहे. यामुळे तुमच्या फोनची बॅटरी खूपच लवकर डिस्चार्ज होईल व काही वेळेस तर फोनचं डिस्प्लेही खराब होऊ शकतो.