TikTok, Helo सहित बॅन अॅप्सची कॉपी असणाऱ्या 'या' नव्या 47 ऍपवर केंद्र सरकारची बंदी, पहा यादी
Tiktok Lite, Helo Lite, SHAREit Lite, BIGO LIVE Lite आणि VFY Lite अशा विविध नावांनी ऍप्लिकेशन डाउनलोड साठी उपलब्ध होते मात्र आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या सहित अन्य एकूण 47 ऍपवर बंदी घातली आहे.
केंद्र सरकारने (Government of India) 59 मोबाइल अॅप्सवर (Mobile Apps) बंदी घातल्यानंतर या ऍप्लिकेशनच्या कॉपीज असणारे लाईट ऍप्स तयार करण्यात आल्याचे दिसत होते, यामध्ये Tiktok Lite, Helo Lite, SHAREit Lite, BIGO LIVE Lite आणि VFY Lite अशा विविध नावांनी ऍप्लिकेशन डाउनलोड साठी उपलब्ध होते मात्र आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Ministry of Electronics and Information Technology) या सहित अन्य एकूण 47 ऍपवर बंदी घातली आहे. जून मध्ये बॅन झालेल्या 59 ऍपचे कॉपी असणारे हे नवे 47 ऍप यापुढे कोणत्याही फोन मध्ये डाउनलोड करता येणार नाहीत. भारताचे सार्वभौमत्व, अखंडता आणि संरक्षण यांसाठी घातक असल्याचे सांगत या अॅप्सवर बंदी घातली गेली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 A अन्वये, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.
मागील काळात भारत आणि चीन युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना चीन उत्पादनांवर बंदी आणण्याच्या मागणीने जोर धरला होता मात्र जून मध्ये स्वतः सरकारनेच अनेक लोकप्रिय चीनी अॅपवर अधिकृतपणे बंदी घातली.यात टिकटॉक, हॅलो सहित शेअर इट, एमआय व्हिडीओ कॉल, विगो व्हिडिओ, ब्युटी प्लस, लाइकी, व्हि मेट, यूसी न्यूज या अॅप्सचा सुद्धा समावेश होता. भारत सरकारने बॅन केलेल्या 59 चिनी ऍप्लिकेशन यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ANI ट्विट
दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयाला भारतीयांनी भरघोस पाठिंबा दर्शवला होता. यानंतर अन्य अनेक मेड इन इंडिया ऍप्स साठी सुद्धा चांगले मार्केट उपलब्ध झाले होते. ज्या लोकांच्या मोबाईलमध्ये हे अॅप्स आहेत, ते जोपर्यंत मॅन्युअली काढले जात नाहीत तोपर्यंत मोबाईलमध्येच राहतील. मात्र एकदा का हे अॅप्स प्ले स्टोअरमधून काढले की युजर्स त्यांच्या स्मार्टफोनमधील अॅप्स अपडेट किंबहुना सुरु ही करू शकणार नाहीत
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)