Flipkart TV Days Sale: 'फ्लिपकार्ट टीव्ही डेज सेल' मध्ये या स्मार्ट टीव्ही वर मिळत आहे बंपर सूट
नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत आहात? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. फ्लिपकार्टने 'फ्लिपकार्ट TV डेज सेल'चे आयोजन केले आहे.
नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत आहात? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. फ्लिपकार्टने (Flipkart) 'फ्लिपकार्ट TV डेज सेल'चे (Flipkart TV Days Sale) आयोजन केले आहे. या सेलअंतर्गत अनेक स्मार्ट टीव्ही वर भरगोस डिस्काऊंट मिळत आहे. यात तुम्हाला 50% हुन अधिक सूट मिळू शकेल.
याशिवाय एक्सिस बँकच्या क्रेडिट कार्ड वरुन पेमेंट केल्यास 10% अधिक डिस्काऊंट दिले जाईल. हा सेल 17 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील. तर जाणून घेऊया कोणत्या टीव्ही वर किती डिस्काऊंट मिळत आहे...
MarQ by Flipkart Dolby (32-inch) HD Ready Smart LED TV
फ्लिपकार्ट TV डेज सेलमध्ये हा स्मार्ट टीव्ही केवळ 10,999 रुपयांना मिळत आहे. याची मूळ किंमत 15,499 रुपये असून यावर 4500 रुपयांची सूट दिली जात आहे.
Thomson B9 Pro (32-inch) HD Ready LED Smart TV
थॉमसन कंपनीच्या स्मार्ट टीव्हीची किंमत बाजारात 16,999 रुपये आहे. मात्र सेलमध्ये यावर 32% सूट दिली जात आहे. त्यामुळे सेलमध्ये हा टीव्ही तुम्ही केवळ 11,499 रुपयांना खरेदी करु शकता.
iFFALCON by TCL F2 (40-inch) Full HD LED Smart TV
हा स्मार्ट टीव्ही सेलअंतर्गत 15,999 रुपयांना विकला जात आहे. या टीव्ही ची मूळ किंमत 23,990 रुपये असून सेलमध्ये यावर 7 हजारांची सूट मिळत आहे.
Vu Premium Smart (32-inch) HD Ready LED Smart TV
Vu Premium या स्मार्ट टीव्हीची किंमत भारतीय बाजारात 16,000 रुपये आहे. मात्र या सेलअंतर्गत हा टीव्ही केवळ 12,499 रुपयांना विकला जात आहे. त्यामुळे चार हजारांपेक्षा अधिक तुमची बचत होईल. त्याचबरोबर यात ईएमआयचा पर्यायही देण्यात येत आहे. यात तुम्हाला 2,084 रुपये प्रति महिना नो कॉस्ट EMI द्यावा लागेल.
LG Smart (32-inch) HD Ready LED Smart TV
फ्लिपकार्टच्या या सेलअंतर्गत LG च्या स्मार्ट टीव्ही वर 7,000 रुपयांचे डिस्काऊंट दिले जात आहे. त्यामुळे सेलअंतर्गत हा टीव्ही 19,999 रुपयांना खरेदी करु शकता. इतकंच नाही तर एक्सचेंज डिस्काऊंटमध्ये 5,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येईल. त्याचबरोबर 1,669 रुपये प्रति महीना किंमतीचा नो-कॉस्ट EMI चा पर्यायही तुम्ही निवडू शकता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)