Flipkart Mobiles Bonanza Sale ला सुरुवात; Phone 11, iPhone SE, Moto G10 Power सह 'या' स्मार्टफोनवर भरगोस सूट
फ्लिपकार्टवर अजून एका सेलला सुरुवात झाली आहे. बोनांजा स्मार्टफोन सेलला आजपासून सुरुवात झाली असून 11 एप्रिलपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. या सेल अंतर्गत आयफोन 11, आयफोन एक्सआर, आयफोन एसई यांसह रियलमी नार्झो या स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काऊंट मिळणार आहे.
फ्लिपकार्टवर अजून एका सेलला सुरुवात झाली आहे. बोनांजा स्मार्टफोन सेलला (Flipkart Mobiles Bonanza Sale) आजपासून सुरुवात झाली असून 11 एप्रिलपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. या सेल अंतर्गत आयफोन 11 (iPhone 11) , आयफोन एक्सआर (iPhone XR), आयफोन एसई (iPhone SE) यांसह रियलमी नार्झो या स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काऊंट मिळणार आहे. त्याचबरोबर नव्याने लॉन्च झालेला मोटो जी10 पावर देखील सवलतीच्या दरात उपलब्ध असेल. डिस्काऊंटसोबतच नो-कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर आणि इतर सुविधा देण्यात येणार आहे. जाणून घेऊया सेलमधील ऑफर विषयी...
आयफोन 11:
फ्लिपकार्टच्या या सेलवर आयफोन 11 वर भरगोस सूट देण्यात येत आहे. या स्मार्टफोनची किंमत 54,900 रुपये असून फ्लिपकार्टवरील सेलमध्ये हा फोन केवळ 46,999 रुपयांना उपलब्ध असेल. थेट 8000 चा डिस्काऊंट मिळत आहे. त्याचबरोबर अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 5 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काऊंट दिला जात आहे.
iPhone SE:
फ्लिपकार्टच्या सेलअंतर्गत iPhone SE वर देखील डिस्काऊंट दिला जात आहे. 29,999 रुपयांत हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. अॅपल स्टोअरवर हा स्मार्टफोन 39,999 रुपयांत उपलब्ध आहे. मात्र सेलमध्ये त्यावर 10,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. त्याचबरोबर अॅक्सिस क्रेडिट कार्डवरुन खरेदी केल्यास 5 टक्कांचा इन्स्टंट डिस्काऊंट दिला जात आहे.
Moto G10 Power:
काही आठवड्यांपूर्वी मोटोरोलाने Moto G10 Power स्मार्टफोन लॉन्च केला. याची किंमत 9999 रुपये इतकी आहे. परंतु, सेलमध्ये यावर 500 रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येत आहे. फ्लिपकार्ट बोनंजा सेलअंतर्गत हा स्मार्टफोन 9499 रुपयांना खरेदी करता येईल. या स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा दिला असून 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर दिला असून 4 जीबी रॅम देण्यात आली आहे. मोटो जी 10 मध्ये 6000 mAh बॅटरी 20W फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
Realme X7 Pro:
Realme X7 Pro स्मार्टफोनची किंमत 29.999 रुपये असून सेलअंतर्गत हा फोन 27,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑनलाईन पेमेंट केल्यास 2000 रुपयांचा थेट डिस्काऊंट मिळेल,
स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असल्यास तुम्ही या सेलचा अवश्य लाभ घेऊ शकता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)