Flipkart Big Shopping Days: 15 मे पासून सुरु होईल फ्लिपकार्ट 'बिग शॉपिंग डेज' सेल; या स्मार्टफोन्सवर मिळेल जबरदस्त सूट
ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टने (Flipkart) Big Shopping Days सेल चे आयोजन केले असून हा सेल 15 मे पासून सुरु होईल.
ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टने (Flipkart) Big Shopping Days सेल चे आयोजन केले असून हा सेल 15 मे पासून सुरु होईल. 4 दिवसांचा हा सेल 19 मे पर्यंत चालेल. या सेलअंतर्गत काही स्मार्टफोन्सवर धमाकेदार ऑफर्स मिळत आहेत.
Flipkart Big Shopping Days सेल अंतर्गत अॅप्पल, सॅमसंग, शाओमी, वीवो, ओपो आणि ऐसुस यांसारख्या कंपन्यांचे स्मार्टफोन्स स्वतात उपलब्ध होतील. या स्मार्टफोन्सवर फ्लॅट डिस्काऊंट सह अॅडिशनल डिस्काऊंट देखील दिला जात आहे. तुमच्याकडे एचडीएफसी बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असल्यास त्यावर तुम्हाला 10% अतिरिक्त डिस्काऊंट मिळेल.
# Nokia 5.1 हा स्मार्टफोन तुम्ही या सेल अंतर्गत 7,999 रुपयांना खरेदी करु शकता. एचडीएफसी कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास 10% अधिक डिस्काऊंट मिळेल.
# Samsung Galaxy J6 च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट तुम्ही या सेलअंतर्गत 8,490 रुपयांना खरेदी करु शकता.
# Nokia 6.1 Plus हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या सेलअंतर्गत 12,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याचबरोबर या फोनवर 10% इंस्टंट डिस्काऊंट देखील दिला जात आहे.
# Honor 10 Lite च्या 4GB रॅम आणि 64GB वेरिएंटची किंमत 16,999 रुपये असून या सेलअंतर्गत हा स्मार्टफोन 12,999 रुपये मिळेल.
# Moto G7 चे 64GB मेमरी वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. या सेलमध्ये हा स्मार्टफोन 16,999 रुपयांना मिळत आहे.
या स्मार्टफोन्स शिवाय Redmi 6, Vivo Y81, Redmi Y2, Asus Max Pro M2 आणि Lenovo या स्मार्टफोन्सवर देखील जबरदस्त सूट मिळत आहे.