1 नोव्हेंबरपासून फ्लिपकार्टचा Big Diwali Sale, टीव्ही, फ्रीजवर मिळणार घसघशीत सूट
बिग दिवाली सेल' हा फ्लिपकार्टचा सेल 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान चालणार आहे.
जसजसा दिवाळीचा सण जवळ येतोय तसा ई कॉमर्स साईट्सावर ऑफरचा पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. नुकताच फ्लिपकार्टने दिवाळीपूर्वीचा तिसरा सेल जाहीर केला आहे. 'बिग दिवाली सेल' हा फ्लिपकार्टचा सेल 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान चालणार आहे. या सेलमध्ये खास ऑफर्स आणि कॅशबॅक डिस्काऊंट मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
काय आहेत ऑफर्स ?
'बिग दिवाली सेल' दरम्यान Mi LED TV 4 Pro (55-inch) हा टीव्ही दररोज दुपारी 12 वाजता विक्रीसाठी खुला राहणार आहे. मागील महिन्यात लॉन्च झालेला हा टीव्ही 49,999 रूपयांमध्ये मिळणार आहे.
बिग दिवाली सेलसाठी फ्लिपकार्टने SBI सोबतही पार्टनरशिप केली आहे. या सेलमध्ये क्रेडीट कार्डासोबत खरेदी केल्यास 10% इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे.
Vu 55-inch 4K Ultra-HD smart TV देखील या सेलमध्ये डिस्काऊंट प्राईजमध्ये उपलब्ध होणार आहे. मूळ 57,999 रूपयांचा हा तीव्ही सेलमध्ये 43,999 रूपयांत उपलब्ध होणार आहे.
फ्लिपकार्टच्या बिग दिवाली सेलमध्ये मोबाईल फोन, स्मार्ट आणि स्टॅडर्ड टीव्ही, फ्रिज, घरगुती वस्तू आदींवर भरघोस सूट मिळणार आहे. सोबतच नो कॉस्ट इएमआय, 22,000 रूपयांची एक्सचेंज ऑफर आणि 399 रूपयांची एक्सिडेंटल वॉरंटीही मिळणार आहे.