Flipkart Big Diwali Sale 2021: फ्लिपकार्ट कडून पुन्हा एकदा 'बिग दिवाळी सेल'ची घोषणा, 28 ऑक्टोबर पासून होणार सुरू

तुम्ही दिवाळीसाठी (Flipkart diwali sale 2021 तारखा) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या सणासुदीच्या सेलमध्ये तुमच्यासाठी अनेक ऑफर आणि अनेक उत्पादनांवर आकर्षक सवलती आल्या आहेत.

Flipkart Big Diwali Sale 2021 (Photo Credits: Flipkart)

ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने पुन्हा एकदा 'बिग दिवाळी सेल'ची घोषणा केली आहे. हा सेल 28 ऑक्टोबर म्हणजेच बुधवारी सुरू होईल आणि 3 नोव्हेंबरपर्यंत चालेल (Flipkart Big Diwali Sale To Begin On October 28, 2021 ). तुम्ही दिवाळीसाठी  खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या सणासुदीच्या सेलमध्ये तुमच्यासाठी अनेक ऑफर आणि अनेक उत्पादनांवर आकर्षक सवलती आल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सेलमध्ये स्मार्टफोन आणि टॅबलेटवर (Flipkart diwali sale laptop) 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. (flipkart diwali sale bank offer) ज्याचा फायदा घेऊन तुम्ही कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकाल. (हे ही वाचा Upcoming Mobiles: मोटोरोला कंपनी मोटो G51 स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत.)

 

 

तुम्हाला (Flipkart Big Diwali Sale) मध्ये कोणत्याही उत्पादनाच्या  खरेदीवर 10 टक्के सूट मिळेल. परंतु ज्यांच्याकडे SBI बँकेचे डेबिट आणि क्रेडिट आहे तेच या सवलतीचा लाभ घेऊ शकतील. याशिवाय नो कॉस्ट ईएमआय ऑप्शनसह स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळेल. एवढेच नाही तर सेलमध्ये एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही अगदी कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकाल. याशिवाय मोबाइल संरक्षणासोबतच स्मार्ट अपग्रेडही मिळणार आहे. मात्र, स्मार्टफोनवर मिळणाऱ्या सवलतीबाबत कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही. विक्री सुरू होण्याच्या एक दिवस आधी कंपनी आपली माहिती शेअर करेल अशी अपेक्षा आहे.

वापरकर्त्यांना हवे असल्यास, (Flipkart Big Diwali Sale) अंतर्गत, डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, पॉवर बँक, स्पीकर आणि इतर उत्पादने देखील आकर्षक सवलतींचा लाभ घेऊन कमी किमंतीत खरेदी करू शकतील. तुम्हाला स्मार्ट टीव्हीवर 75 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की यावेळी सेल दरम्यान 'फ्लिपकार्ट क्रेझी डील' देखील चालवली जाईल आणि वापरकर्ते रात्री 12, सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता या डीलमध्ये सहभागी होऊ शकतील. प्रत्येक तासाला तुम्हाला भरपूर फायदा घेण्याची संधी मिळेल.