Facebook चे नवे फिचर रोलआउट, एकाच वेळी 50 जणांसोबत व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून संवाद साधता येणार
यामध्ये युजर्सला मोबाईल किंवा डेस्कटॉपच्या मदत घेता येणार आहे. याची घोषणा कंपनीने गुरुवारी केली आहे.
फेसबुक (Facebook) कंपनीने त्यांचे नवे व्हिडिओ चॅट फिचर Messenger Rooms सर्वांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. यामध्ये युजर्सला मोबाईल किंवा डेस्कटॉपच्या मदत घेता येणार आहे. याची घोषणा कंपनीने गुरुवारी केली आहे. सिंगल रुममध्ये 50 जणांसह व्हिडिओ कॉलिंगवर संवाद साधता येणार आहे. हे फिचर Zoom व्हिडिओ कॉलिंगसारखेच आहे. लॉकडाउनच्या काळात यासारख्या टूल्सची प्रचंड डिमांड आहे. नवे प्रोडक्टसमध्ये अधिक फिचर्स देण्यात आले असून ते फेसबुक मेसेंजर व्हिडिओ कॉलिंग फंक्शनच्या पुढील वर्जन आहे. याच्या माध्यमातून मुख्य फेसबुक अॅप किंवा डेडिकेटेड मॅसेंजरच्या माध्यमातून 50 जणांसोबत बोलता येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये वेळेचे बंधन नसणार आहे.
फेसबुकने असे म्हटले आहे की, व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी तुमच्या सोबत आणखी कोणत्या वक्तींना जोडण्यात यावे हे सर्वोतोपरी तुमच्यावर असणार आहे. तसेच एका लिंकच्या माध्यमातून सुद्धा जोडले जाऊ शकणार आहात. ज्यांचे फेसबुक खाते नाही आहे त्यांना सुद्धा येथे व्हिडिओ कॉलिंगवर बोलता येणार आहे. फेसबुकने याबाबत अधिक माहिती देत असे ही सांगितले आहे की, युजर्स न्यूज फिड, ग्रुप्स किंवा इव्हेंट्सच्या माध्यमातून मॅसेंजर किंवा थेट फेसबुकवरुन रुम्स तयार करता येणार आहे.(Twitter चा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांना दिला कायमस्वरूपी Work From Home करण्याचा पर्याय)
दरम्यान, फेसबुकच्या नव्या फिचर्समध्ये अशी अट आहे की, जगभरातील युजर्सना फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून रुम क्रिएट करता येणार आहे. पण US च्या युजर्सला थेट फेसबुक अॅपच्या मदतीने रुम बनवता येणार आहे. कंपनीने असे ही स्पष्ट केले येत्या महिन्यात मेसेंजर रुम्समध्ये नवे फिचर्स सुद्धा युजर्सला मिळणार आहेत. व्हिडिओ कॉलिंगच्या रुम्ससाठी एखाद्याला इन्वाइट करण्यासोबत त्याला तुम्ही काढून सुद्धा टाकू शकता. फेसबुकने त्यांच्या ब्लॉक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ऐवढेच नाही युजर्सला रुम्स लॉक सुद्धा करता येणार असून तेथे दुसरा व्यक्ती जोडला जाणार नाही. मेसेंजर रुम्स फेसबुक किंवा मेसेंजर अॅपच्या लेटेस्ट वर्जनमध्ये उपलब्ध असणार आहेत.