Facebook Dating app: फेसबुकवर देखील सुरु होणार डेटिंग, सिक्रेट क्रशला द्या प्रेमाची कबुली

फेसबुक डेटिंग ऍपच्या हटके सुविधेचा वापर करून आता फेसबुकवरील फ्रेंडलिस्ट मध्ये सिक्रेट क्रशला सामील करता येणार आहे, काय असेल ही सुविधा याविषयी जाणून घ्या

ऑनलाईन डेटिंग (Photo credits: RachelScottYoga/Pixabay)

तुमच्याही फेसबुकच्या (Facebook) मित्रांच्या यादीत एखादं स्पेशल नाव आहे का? तासंतास या विशेष व्यक्तीचे अकाऊंट तुम्ही स्टॉक करत असता का? मात्र आता न घाबरता त्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची कबुली देता यावी म्हणून फेसबुकनेच आपल्या युजर्स साठी एक विशेष सुविधा तयार केली आहे. मंगळवारी कॅलीफोर्निया येथे झालेल्या 'F8' परिषदेत (F8 Conference) या फेसबुक डेटिंग ऍपच्या (Facebook Dating App) निर्मितीची घोषणा करण्यात आली.

 

या डेटिंग ऍपच्या माध्यमातून आजवर सीक्रेट ठेवलेल्या क्रश सोबत खरंखुरं रोमँटिक नातं बनवता येणार आहे. या फीचरचं नाव सिक्रेट क्रश (Secret Crush) असं असून या पर्यायाचा वापर करून तुम्हाला एकाच वेळी आपल्या फ्रेंडलिस्ट मधील 9 जणांना क्रशच्या यादीत सामील करता येणार आहे. यासाठी तुमच्या खास व्यक्तीने देखील आपल्या फेसबुकच्या सेटिंग मध्ये फेसबुक डेटिंग चा पर्याय निवडणे गरजेचे आहे.  डेटिंग अॅपवर चॅट करताना या '4' गोष्टी बोलणे टाळा !

 फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तुम्ही तुमच्या सिक्रेट क्रशच्या यादीत एखाद्या व्यक्तीचे नाव जोडलं तेव्हा त्या व्यक्तीला फेसबुकवरून एक नोटिफिकेशन पाठवण्यात येईल, त्यानंतर त्या व्यक्तीने तुमची रिक्वेस्ट स्वीकारून तुम्हाला ही त्यांच्या सिक्रेट क्रश च्या यादीत जोडल्यास तुम्ही मॅच होऊ शकता. यातील महत्वाचा भाग म्हणजे जर तुमच्या क्रश ने ही रिक्वेस्ट स्वीकारली नाही तर याबाबत इतर कोणालाही कळणार नाही. तसेच जर तुमच्या क्रशने हा पर्याय निवडलाच नसेल तर तुम्ही त्यांना ऍड करून काही फायदा होणार नाही.यासाठी क्रश शोधायचा झाल्यास फेसबुक इवेंट्स, ग्रुप्स, फ्रेंड्स ऑफ फ्रेंड किंवा अन्य कम्युनिटी मधील तुमच्या आवडीच्या व्यक्तींचे प्रोफाईल्स तपासून पाहू शकता.

सध्या ही सुविधा कोलंबिया, थायलॅन्ड कॅनडा, अर्जेटीना आणि मेक्सिको या देशांमध्ये कार्यरत आहे.या सोबतच समान शाळा,ऑफिस, आणि शहरात राहणाऱ्या व्यक्तींना एकमेकांशी जोडण्यासाठी व तिथून नवीन मैत्रीला चालना देण्यासाठी 'मीट न्यू फ्रेंड्स' ही सुविधा देखील तयार केल्याची माहिती फेसबुकने दिली.