खुशखबर! Flipkart वर महागडा iPhone फक्त 14 हजार199 रुपयांत

आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये अॅपल कंपनीचा आयफोन, आयपॅड अगदी कमी किंमतीत उपलब्ध आहे. सर्वसामान्य ग्राहकांना इच्छा असतानाही आयफोन खरेदी करता येत नाही. परंतु, या सेलमध्ये त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. कारण, त्यांना येथे अगदी कमी दरात आयफोन खरेदी करता येणार आहे.

iPhone (फोटो सौजनय- ट्विटर)

Flipkart वर सुरू असलेल्या अॅपल डेज सेलमध्ये महागडा iPhone फक्त 14 हजार199 रुपयांत खरेदी करता येत आहे. आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये अॅपल कंपनीचा आयफोन, आयपॅड अगदी कमी किंमतीत उपलब्ध आहे. सर्वसामान्य ग्राहकांना इच्छा असतानाही आयफोन खरेदी करता येत नाही. परंतु, या सेलमध्ये त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. कारण, त्यांना येथे अगदी कमी दरात आयफोन खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकाकडे जर HDFC क्रेडिट/डेबिट कार्ड असेल तर यावर 5 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच iPhone XR मधील 128 GB वेरिअंटवर ग्राहकांना 5 हजाराची सूट मिळत आहे. (हेही वाचा - USB Condom म्हणजे काय? तो कशासाठी वापरतात? 'यूएसबी कंडोम' किती रुपयांना मिळतो?)

IPhone 8 सिरिजमधील 64GB वेरिअंटवर 5 हजार 901 रुपयांचा डिस्काउंट आहे. या मोबाईलची किंमत 39 हजार 900 रुपये आहे. पंरतु, अॅपल डेज सेलमध्ये ग्राहकांना हा मोबाईल केवळ 33 हजार 999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. तसेच iPhone 7, 32GB रोज गोल्ड खरेदी केल्यानंतर त्यावर 16 टक्के सूट दिली जात आहे. या आयफोनची किंमत 29 हजार 900 रुपये आहे. परंतु, या सेलमध्ये हा फोन 24 हजार 999 रुपयांत उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे हा आयफोन 14 हजार 199 रुपयांतही खरेदी करता येणार आहे. यासाठी ग्राहकांना एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. यात 10 हजार 800 रुपयांची सूट देण्यात येत आहे.

हेही वाचा - अबब! 12 कोटींना मिळणार सॅमसंगचा नवा टीव्ही; पाहूया या सर्वात महागड्या टीव्ही चे फीचर्स आहेत तरी काय?

IPhone 11 या अॅपलच्या लेटेस्ट फोनची किंमत 64 हजार 900 रुपये इतकी आहे. परंतु, सध्या या फोनवर 6 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. यासाठी तुम्हाला HDFC डेबिट/क्रेडिट वरून पेमेंट करावे लागणार आहे. फ्लिपकार्टने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या खास ऑफर दिल्या आहेत. तुम्हालाही आयफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही अॅपल डेज सेलचा लाभ घेऊ शकता आणि अगदी कमी किंमतीत आयफोन खरेदी करू शकता.