IPL Auction 2025 Live

Google वर चुकूनही 'या' गोष्टी सर्च करू नका; अन्यथा होईल मोठे नुकसान

खालील मुद्द्यांच्या आधारे गुगलवर कोणत्या गोष्टींविषयी सर्च करू नये, यासंदर्भात जाणून घेऊयात

Google search (PC - pixabay)

आजकाल प्रत्येकजण कोणत्याही गोष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी गूगल सर्च इंजिनचा वापर करतो. गुगलवर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे अचूक परिणाम मिळतात. परंतु, बर्‍याचहा आपण गुगलवर अशा गोष्टी शोधतो, ज्यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो. आज या लेखातून आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेऊयात. गुगलवर खालील गोष्टी शोधल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. तथापि, तुमची ही चूक तुम्हाला तुरुंगाची हवा खायला भाग पाडू शकते. तसेच काही गोष्टीचा आपल्या जीवनावर विपरित परिणाण होऊ शकतो. त्यामुळे गुगलवर चुकूनही अशा आक्षेपार्ह गोष्टींची माहिती सर्च करू नका. खालील मुद्द्यांच्या आधारे गुगलवर कोणत्या गोष्टींविषयी सर्च करू नये, यासंदर्भात जाणून घेऊयात... (हेही वाचा - LG ने एकाच वेळी लाँच केले तीन नवीन स्मार्टफोन; जाणून घ्या LG W11, W31 आणि W31+ ची किंमत आणि खास फिचर्स)

गोळ्या-औषध गुगलवर सर्च करू नका-

जर तुम्हाला आरोग्याची समस्या जाणवत असेल तर आपल्या लक्षणांवर आधारित Google वर औषध-गोळ्यांचा शोध घेण टाळा. चुकीची औषधे घेतल्यास तुमचे आरोग्य आणखी बिघडू शकते. म्हणून जेव्हा जेव्हा आपली तब्येत खराब असेल तेव्हा ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

बॉम्ब कसा बनवायचा याचा शोध घेऊ नका -

बॉम्ब बनवण्यासंदर्भात कोणतीही गोष्ट गुगलवर सर्च करू नका. बॉम्ब बनविण्याची पद्धत किंवा त्याशी संबंधित कोणतीही गोष्ट शोधल्यामुळे आपणास तुरूंगात देखील जाव लागू शकतं. Google वर आपण या प्रकारच्या कटेंटचा शोध घेत असाल, तर आपला आयपी अॅड्रेस सुरक्षा यंत्रणांपर्यंत पोहोचवला जावू शकतो. त्यानंतर सुरक्षा एजन्सी आपल्याविरूद्ध कारवाई करू शकतात.

Google वरून थेट मोबाइल अ‍ॅप्स डाउनलोड करू नका -

थेट गुगलवरून कोणतही अॅप डाऊनलोड करू नका. जेव्हा गुगल प्ले स्टोअरवर अॅप असेल, तेव्हाचं हे अॅप तुम्ही डाऊनलोड करा. कारण, बऱ्याचदा गुगलवर फेक अॅप्स असतात. जे आपला डेटा चोरी करू शकतात. गुगल प्ले स्टोअर कोणत्याही अॅपची आधी योग्य तपासणी करूनचं ते यूजर्संना डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देत असते. त्यामुळे प्ले स्टोअरवरूनचं अॅप डाऊनलोड करा.

Google वर खाजगी ईमेल शोधू नका -

लक्षात ठेवा, Google वर आपले वैयक्तिक ईमेल लॉगिन शोधणे टाळा. असं केल्यास तुमचे अकाऊंट हॅक होण्याची तसेच पासवर्ड लिक होण्याची शक्यता असते. यामुळे तुम्ही आपल्या ईमेल आयडीद्वारे करण्यात आलेल्या घोटाळ्यात देखील अडकू शकता.

ग्राहक सेवा क्रमांक -

आपल्याला कोणतेही प्रोडक्ट वापरताना अडचण आल्यास आपण गुगलवरून ग्राहक सेवा क्रमांक सर्च करतो आणि यावर फोन लावतो. परंतु, या नंबरवर कॉल करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे गुगलवर ग्राहक सेवा क्रमांक शोधणं टाळा.

सायबर क्राइमला प्रोत्साहन देणारे हॅकर्स गुगल सर्चमधील कोणत्याही कंपनीचा बनावट हेल्पलाईन नंबर फ्लोट करतात. अशा परिस्थितीत जेव्हा आपण त्या नंबरवर कॉल करता तेव्हा आपला नंबर हॅकर्सपर्यंत पोहोचतो. त्यानंतर सिम स्वॅप सारख्या घटनांसह सायबर क्राइम करण्यासाठी हॅकर्स आपल्या नंबरवर कॉल करू शकतात.