कोरोना विषाणूचा व्यापार जगातावरही परिणाम? स्मार्टफोन, टी.व्ही, वॉशिंग मशीन महागण्याची शक्यता, कारण घ्या जाणून
परिणामी, व्यापार जगतावरही (Trade Market) याचा परिणाम दिसू लागला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमधून भारतात आयात केले जाणारे अनेक साहित्यांवर मोठा परिणाम झाला आहे.
कोरोनी विषाणूने (Corona Virus) चीनसह जगभरातही थैमान घालायला सुरुवात केली आहे. परिणामी, व्यापार जगतावरही (Trade Market) याचा परिणाम दिसू लागला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमधून भारतात आयात केले जाणारे अनेक साहित्यांवर मोठा परिणाम झाला आहे. यात स्मार्टफोन, टिलेव्हिजन आणि वाशिंग मशीन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अधिक समावेश आहे. तसेच भारतात नव्या उत्पादनात कपात आणि नव्या उत्पादनांच्या लाँचिंगमध्ये उशीर होत आहे. महत्वाचे म्हणजे, भारतात इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स आयात करण्यासाठी जितका उशीर होईल तेवढाच परिणाम इलेक्ट्रॉनिक उद्योगावरही पाहायला मिळणार, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
टेलिव्हिजन तयार करण्यासाठी वापरले जाणारे जवळपास 75 टक्के कंपोनेंट्स आणि स्मार्टफोन कव्हर्सचे 85 टक्के कंपोनेंट्स चीनमधून आयात केले जातात. यामध्ये मोबाइल डिस्प्ले, ओपन सेल टीव्ही पॅनल, मुद्रित सर्किट बोर्ड, कॅपेसिटर, मेमरी आणि एलईडी चिप्स यांसारखे कंपोनेंट्स चीनमधून आयात केले जातात. याशिवाय एअर कंडीशनर कंप्रेसर्स आणि वॉशिंग मशीनच्या मोटर्सची आयातही चिनी कंपन्यांद्वारे केली जाते. बाजाराच्या सद्यस्थितीनुसार चनी कंपन्यांनी त्यांच्या कंपोनेंट्सच्या किंमतीत 2 टक्क्यांनी वाढ केली आहे. जर ही परिस्थिती कायम राहिली तर, भारतात इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- भारतात कोरोना व्हायरसचा शिरकाव, केरळ येथे Coronavirus चा पहिला रुग्ण आढळला
देशाबाहेर बहुसंख्यांक नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. चीन येथे गेल्या 24 तासात 38 जणांचा मृत्यू झाला आहे. आता कोरोना विषाणू भारतातही दाखल झाला असून केरळ येथे त्याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. कोरोनाची लागण जनावरे आणि नागरिकांना होऊ शकते. याची लागण झाल्यास श्वसनासंबंधित समस्या उद्भवतात. तसेच सर्दी होणे, खोकला आणि घसा खवखवणे अशी या कोरोना व्हायरसची लक्षणे आहेत.