DTH युजर्ससाठी खुशखबर! लवकरच SMS च्या माध्यमातून चॅनल निवडता येणार
तसेच नको असलेले चॅनल्स सुद्धा अनसब्सक्राइब करता येणार आहेत. टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायने (TRAI) डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म्स ऑपरेशन यांना निर्देशन देत असे सांगितले आहे की, लवकरच चॅनल्स आता एसएमएसच्या माध्यातून निवडण्याची सुविधा सुरु करावी.
DTH युजर्सला आता लवकरत एका टेक्स्ट मेसेजच्या चॅनलची निवड करता येणार आहे. तसेच नको असलेले चॅनल्स सुद्धा अनसब्सक्राइब करता येणार आहेत. टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायने (TRAI) डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म्स ऑपरेशन यांना निर्देशन देत असे सांगितले आहे की, लवकरच चॅनल्स आता एसएमएसच्या माध्यातून निवडण्याची सुविधा सुरु करावी. त्याचसोबत ट्रायने डीपीओला चॅनल क्रमांक 999 वर सर्व चॅनलची माहिती आणि त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कांची माहिती देण्यास सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांना अगदी सोप्या पद्धतीने आवडीचे चॅनल निवडता येणार आहे. तसेच आवडीच्या चॅनलसाठी किती रुपये द्यायचे हे सुद्धा त्यांना कळणार आहे.
ट्रायने एसएमएसच्या माध्यमातून चॅनल निवडण्याची सुविधा 15 दिवसात चॅनल क्रमांक 999 वर उपलब्ध करुन डीपीओला सांगितले आहे. त्याचसोबत सब्सक्राइब आणि अनसब्सक्राइब चॅनलचा पर्याय सुद्धा यामध्ये जोडण्यास सांगितला आहे. तर ग्राहकांनी निवडलेले किंवा नको असलेल्या चॅनल बाबत माहिती दिल्यास त्यावर 72 तासांच्या आतमध्ये काम पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे.(अभिमानास्पद! जगातील नामांकित कंपन्यांमध्ये Infosys तिसऱ्या स्थानी; टॉप 250 मध्ये भारतातील 17 कंपन्या, पहा यादी)
चॅनलच्या निवडण्याच्या बाबत घेण्यात आलेला निर्णय हा काही केबल ऑपरेटर्स या ट्रायच्या काही नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. परंतु ग्राहकाला एकसमान आणि उत्तम सर्विस देण्यासाठी हा पर्याय योग्य आहे. सध्या 999 चॅनलवर देण्यात येणारी माहिती सर्व ऑपरेटर्सवर विविध आहे. त्यामुळे ग्राहकांना पूर्णपणे चॅनलसंबंधित माहिती मिळत नसल्याचे ट्रायने मान्य केले आहे.
ट्रायने ही सुविधा चालू करण्यासाटी 20 सप्टेंबरला डीपीओसोबत एक माहिती शेअर करण्याची पद्धत सांगितली होती. त्यानंतर 26 सप्टेंबरला झालेल्या एता बैठकीत डीपीओकडून यासंबंधित आपले मतं मांडण्यास सांगितले होते. तर आता ट्रायकडून या कार्यप्रणालीला हिरवा कंदिल दाखवण्यात आला असून चॅनल निवडणे किंवा हटवणे हे फक्त एका एसएमएसच्या सहाय्याने होणार आहे. मात्र यावर अधिकृतपणे निर्णय घेण्यात आल्यानंतर ही सुविधा ग्राहकांना लागू करण्यात येणार आहे.