WhatsApp वर चॅटिंगची मजा द्विगुणित करण्यासाठी लवकरच येत आहे 'Sticker Shortcut' फिचर, जाणून घ्या काय असेल यात विशेष
कारण यात तुम्हाला अनेक रंगाच्या इमोजीस आणि इतर गोष्टी मिळणार आहेत.
सध्या सोशल मिडियाशिवाय माणसाच्या दिवसाची सुरुवात होत नाही. त्यात चॅटिंग अॅप व्हॉटसअॅपने (WhatsApp) तर आपल्या युजर्सला एकाहून एक जबरदस्त सेवा देऊन आपलं वेडं लावलं आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी अनेक अॅप प्रयत्नात आहे. अशा वेळी व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सला धरून ठेवण्यासाठी लवकरच एक नवे फिचर रोलआऊट करण्याच्या तयारीत आहे. या फिचरमुळे तुम्हाला WhatsApp चॅटिंगदरम्यान जबरदस्त अनुभव मिळणार आहे. WABetaInfo आपल्या ट्विटर पेजवरुन याबाबत माहिती दिली आहे. Sticker Shortcut असे या फिचरचे नाव असणार आहे.
रिपोर्टनुसार, या स्टिकर शॉर्टकटमुळे व्हॉट्सअॅपवर चॅट करताना खूप मजा येणार आहे. कारण यात तुम्हाला अनेक रंगाच्या इमोजीस आणि इतर गोष्टी मिळणार आहेत.हेदेखील वाचा- WhatsApp मध्ये नवे फिचर रोलआउट, आता डेस्कटॉप युजर्सला मिळणार कॉलिंगची सुविधा
हे नवे फिचर रोलआऊट झाल्यानंतर युजर्सला चॅट बारमध्ये इमोजी एंटर केल्यावर वा कोणता शब्द लिहिल्यावर वेगवेगळ्या रंगाचे आयकॉन दिसतील. तसचे तुमच्या कीबोर्डला एक्सपांड केल्यावर व्हॉट्सअॅपसाठी सुद्धा स्टिकर दिसतील.
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, हे स्टीकर शॉर्टकट फिचर अॅनड्रॉईड डिवाईससाठी तयार केली जात आहे. त्यामुळे लवकरच हे फीचर व्हॉट्सअॅप बीटा युजर्ससाठी रोलआऊट केले जाऊ शकते असेही सांगण्यात येत आहे.
व्हॉटसअॅपच्या या नव्या फिचरमुळे युजर्सला चॅटिंगदरम्यान खूप उत्कृष्ट अनुभव मिळेल. त्याशिवाय कंपनीने अॅनड्रॉईड आणि iOS बेस्ड अॅप्ससाठी नवीन अॅनिमेटेड स्टिकर पॅकसुद्धा रिलीज केले आहेत. हा फीचर व्हॉट्सॅप वेबसाठी उपलब्ध आहे. 2.4MB साइज असलेल्या या स्टिकर पॅकचे नाव आहे Sumikkogurashi. थोडक्यात आपल्या प्रतिस्पर्धींनी टक्कर देण्यासाठी व्हॉट्सअॅप पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे.