Clubhouse अॅप Google Play Store वर उपलब्ध; 'या' सोप्या पद्धतीने करा इंस्टॉल
कंपनीने अॅनरॉईड व्हर्जनचे टेस्टिंग काही आठवड्यांपूर्वी सुरु केले होते.
Clubhouse हा Invite-Only Audio App आता डाऊनलोडींगसाठी गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) उपलब्ध आहे. कंपनीने अॅनरॉईड व्हर्जनचे टेस्टिंग काही आठवड्यांपूर्वी सुरु केले होते. मागील वर्षी मार्च महिन्यात हा अॅप आयओएस (iOS) युजर्ससाठी उपलब्ध झाला होता. त्यानंतर आता अॅपची ग्रोथ वाढवण्यासाठी कंपनीने अॅनरॉईड (Android) युजर्ससाठी देखील अॅप उपलब्ध करुन दिला आहे. (Instagram वर Clubhouse सारखे फिचर, लाईव्ह दरम्यान व्हिडिओ-ऑडिओ करता येणार बंद)
अॅनरॉईड 8.0 आणि त्यावरील ऑपरेटींग सिस्टम वर चालणाऱ्या अॅनरॉईड युजर्ससाठी हे अॅप हा अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यामुळे अॅप डाऊनलोड करण्यासाठी इच्छुक असलेले युजर्स गुगल प्ले स्टोअर सर्चबार वर 'Clubhouse' सर्च करुन तो डाऊनलोड करु शकतात. मात्र तुम्ही योग्य अॅप डाऊनलोड करत आहात ना याची खात्री करणे आवश्यक आहे. या अॅपमध्ये Sign in करण्यासाठी आधीच्या युजर्सकडून इन्व्हिटेशन येणं गरजेचं आहे.
अॅप डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध झाला असला तरी याची व्हेरिफिकेशन प्रोसेस नीट चालत नसल्याची तक्रार अनेक युजर्स करत आहेत. गुगल प्ले स्टोअर वर युजर्सच्या तक्रारी पाहायला मिळत आहेत. Sign Up केलेल्या अनेक युजर्संना व्हेरिफिकेशन कोड अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे ते आपला मोबाईल नंबर पुन्हा टाकून प्रयत्न करत असताना त्यांना 'it is incorrect' किंवा 'is not supported' असा मेसेज अॅपकडून दाखवला जात आहे.
हे पब्लिक बीटा व्हर्जन ऑफ क्लबहाऊस असून अद्याप अॅनरॉईड युजर्ससाठी स्टेबल व्हर्जनची घोषणा झालेली नाही. दरम्यान, Tesla, SpaceX CEO Elon Musk आणि फेसबुक फाऊंडर Mark Zuckerberg यांनी वापरल्यामुळे हे अॅप लोकप्रिय झाले आहे.
अनेक सोशल मीडिया माध्यमं त्यांचे क्लबहाऊस व्हर्जन सुुर करण्याचा प्रयत्न करत आहेत. फेसबुक, LinkedIn आपल्या ऑ़डिओ चॅट अॅप्सवर काम करत आहेत. त्यामुळे सध्याच्या स्पर्धेच्या युगात या माध्यमांची ऑडिओ चॅट अॅप कशी असतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.