Centre Launches CRS App: जन्म,मृत्यू च्या नोंदणीसाठी केंद्र सरकार कडून CRS App लॉन्च; पहा कसं करतं काम?

हे लेगसी रेकॉर्डचे डिजिटायझेशन देखील करते, ज्यामुळे नोंदणी प्रक्रिया पेपरलेस होणार आहे.

Office ((Photo Credits: Pexels)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी Civil Registration System (CRS) हे नवं मोबाईल अ‍ॅप लॉन्च केले आहे. यावा जन्म मृत्यूची नोंदणी होणार आहे. Registrar General and Census Commissioner of India कडून हे अ‍ॅप बनवण्यात आलं असून याच्या माध्यमातून जन्म मृत्यू नोंदणीची प्रक्रिया सुकर होणार आहे.

अमित शाह यांनी याबद्दल X वर पोस्ट करत माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, ॲप जन्म आणि मृत्यू नोंदणीची प्रक्रिया सुलभ करेल, ज्यामुळे नागरिकांना कधीही, कुठेही आणि त्यांच्या राज्याच्या अधिकृत भाषेत नोंदणी करता येईल. "नोंदणीसाठी लागणारा वेळ कमी करेल." असेही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी पोस्ट सोबत भारताच्या रजिस्ट्रार जनरलचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ॲपचा इंटरफेस दाखवला आहे. हे स्पष्ट करते की CRS मोबाइल ॲप डिजिटल प्रमाणपत्र वितरण आणि लेगसी रेकॉर्डचे ऑनलाइन डिजिटायझेशन सक्षम करते आणि ॲपच्या ऑपरेशन आणि देखभालसाठी राज्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही.

CRS अ‍ॅप  काम कसं करत?

डिजिटल गव्हर्नन्स चा विचार करून हे अ‍ॅप  डिझाइन केलेले आहे.  हे लेगसी रेकॉर्डचे डिजिटायझेशन देखील करते, ज्यामुळे नोंदणी प्रक्रिया पेपरलेस होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif