BSNL बीएसएनएलने केले आपल्या काही डेटा प्लानमध्ये बदल, ज्यादा डेटा प्लानसह ह्या 2 प्लान्सची वाढवली वैधता
खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत तग धरुन ठेवण्यासाठी बीएसएनएल(BSNL) ह्या सरकारी कंपनीने आपल्या सद्यस्थितीत असलेल्या 2 प्लान्समध्ये बदल केलेले आहेत.
वाढत्या मोबाईल वापरामुळे खासगी टेलिकॉम कंपन्यांचे(Telecom Company) प्लानही दिवसेंदिवस बदलत चालले आहेत. त्याच मोबाईल वापरासह इंटरनेट डेटा(Internet Data) प्लानही तितकाच महत्त्वाचा झालाय. त्यामुळे आपल्या ग्राहकांसह सतत निरनिराळ्या प्लान्समध्ये आकर्षित करण्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्यांमध्ये जणू चुरसच लागलेली असते. त्यामुळे ह्या खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत तग धरुन ठेवण्यासाठी बीएसएनएल(BSNL) ह्या सरकारी कंपनीने आपल्या सद्यस्थितीत असलेल्या 2 प्लान्समध्ये बदल केलेले आहेत.
बीएसएनएलच्या 47 रुपये आणि 198 रुपयांच्या प्लानमध्ये बदल करण्यात आले आहे. यात 47 रुपयांच्या प्लानमध्ये 11 दिवसांची वैधता आणि अमर्याद लोकल (Local calls) आणि एसटीडी कॉल्सची (STD) सेवा देण्यात आली होती. मात्र आता ह्या कॉल्ससोबत 1GB डेटा सुद्धा मिळणार असून ह्या मूळ प्लानची वैधता(Validity) 11 दिवसांवरुन 9 दिवस केली आहे.
BSNL च्या नव्या प्लॅनमध्ये IPL फॉलोअर्सना मिळणार जबरदस्त सुविधा
तर 198 रुपयाच्या प्लानमध्ये दिवसा 1.5GB डेटा मिळत होता . तसेच ह्या दिवसाची डेटा वापराची मर्यादा संपल्यानंतर डेटा स्पीड कमी होऊन 40Kbps इतका स्पीड मिळायचा. तसेच 28 दिवसांची ह्या प्लानची वैधता होती. मात्र आता कंपनीने ह्या प्लानची वैधता 54 दिवसांची केली असून ग्राहकांना रोज 2GB डेटा मिळेल. म्हणजेच ह्या प्लानमध्ये एकूण 42GB डेटाऐवजी 108GB डेटा मिळेल.