Apple TV Plus भारतात लाँच; किंमत फक्त 99 रुपये
काही वृत्तांनुसार, Apple टीव्ही प्लस 40 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध असेल. यातील कार्यक्रम डब किंवा टायटलसह दाखवले जातील. ही सेवा आयफोन, आयपॅड, Apple टीव्ही, आयपॉड टच, मॅक यासह tv.apple.com वरही उपलब्ध आहे.
वेगवान आणि बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार स्वत:ला अपडेट करत मोबाईल क्षेत्रातील जगातील अग्रगण्य कंपनी Appleने भारतात Apple TV Plus सेवा सुरु केली आहे. शुक्रवारपासून (1 नोव्हेंबर) ही सेवा भारतात लाइव्ह करण्यात आली आहे. अॅप्पल कंपनीची ही एक स्ट्रीमिंग व्हिडिओ सेवा आहे. मुख्य म्हणजे ट्रायल म्हणून सुरुवातीचे 7 दिवस ही सेवा कंपनीकडून मोफत दिली जात आहे. ग्राहकांना ही सेवा आवडल्यास ही सेवा तुमच्या आयफोनमध्ये सुरु करण्यासाठी प्रति महिना 99 रुपये आकारण्यात येणार आहे. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, याच महिन्यात मार्चमध्ये अॅप्पल ने या सेवेची घोषणा केली होती.
Apple TV Plus ही सेवा जगातील 100 पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध आहे. काही वृत्तांनुसार, Apple टीव्ही प्लस 40 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध असेल. यातील कार्यक्रम डब किंवा टायटलसह दाखवले जातील. ही सेवा आयफोन, आयपॅड, Apple टीव्ही, आयपॉड टच, मॅक यासह tv.apple.com वरही उपलब्ध आहे.
अॅप्पल टीव्ही प्लस या ऑनलाईन स्ट्रीमिंग सेवेचा दर हा इतर सेवांपेक्षा सर्वात कमी आहे. अमेरिकेत या सेवेचा दर प्रति महिना 4.99 रुपये म्हणजे सर्वसाधारण 350 रुपयांपेक्षा जास्त आहे.
मोफत सबस्क्रिप्शनसाठी काय कराल ?
1. Apple TV Plus मोफत पाहण्यासाठी युझर्स Apple TV App किंवा वेब ब्राऊजरवर जाऊ शकतात.
2. ही सेवा आयफोनसह Apple TV 4K, Apple TV एचडी, थर्ड जनरेशन Apple TV, आयपॉड टच आणि मॅक कम्प्युटर्सवर उपलब्ध आहे.
हे देखील वाचा- NetFlix ने भारतात लाँच केला 199 रुपयांचा 'Mobile Only' प्लान
Apple डिव्हाईस नसल्यास काय कराल ?
1. रोकू डिव्हाईस, निवडक सॅमसंग स्मार्ट टीव्ही किंवा अमेझॉन फायर टीव्हीच्या माध्यमातून Apple TV App वर साइन अप करा.
2. निवडक सॅमसंग, एलजी आणि VIZIO स्मार्ट टीव्ही वर Apple TV Plus वापरण्यासाठी Apple ची वायफाय स्ट्रिमिंग टेक्नोलॉजी AirPlay 2 चा वापर करा.
हेदेखील वाचा- iphone प्रेमींंसाठी महत्त्वाची बातमी; लवकरच iOS 8 ला WhatsApp सपोर्ट बंद होणार
3. सफारी, क्रोम किंवा फायरफॉक्स ब्राऊजरमधून tv.apple.com लाही भेट देता येईल.
4. येत्या काही दिवसात ही सेवा इतर स्मार्ट टीव्ही, स्ट्रिमिंग बॉक्सेस आणि स्ट्रिमिंग स्टिक्सवर उपलब्ध करुन देणार असल्याचं Apple ने सांगितलं आहे.
या सेवेमध्ये तुम्हाला 'See', 'The Morning Show', 'Dickinson', 'Servant', 'For All Mankind', 'Snoopy In Space' यांसारखे प्रसिद्ध शो पाहायला मिळतील.