Apple Event Live Streaming: आज रात्री ऍपलचा बहुप्रतीक्षित इव्हेंट; iPhone 14 Series सह लॉन्च होणार अनेक नवीन डिव्हाइस; जाणून घ्या कुठे पाहाल लाइव्ह स्ट्रीमिंग
अॅपल यावर्षी अनेक नवीन उपकरणे लाँच करणार असल्याचे सांगितले जात आहे. कंपनी आज चार नवीन iPhone सादर करू शकते - 6.1-इंचाचा iPhone 14, 6.7-inch iPhone 14, 6.1-inch iPhone 14 Pro आणि 6.7-इंचाचा iPhone 14 Pro max.
अॅपलच्या (Apple) वार्षिक कार्यक्रमाची प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे. आतापासून काही तासांमध्ये, Apple त्याच्या क्युपर्टिनो-कॅम्पसमध्ये फार आऊट इव्हेंट आयोजित करेल. या इव्हेंटमध्ये कंपनी नवीन iPhones, नवीन Apple Watch आणि Airpods Pro 2 सह काही मोठ्या घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. साथीच्या रोगानंतर दोन वर्षांनी, Apple कंपनी स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये असा कार्यक्रम आयोजित करेल. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरू होईल. अॅपलचा या वर्षातील हा तिसरा कार्यक्रम असेल.
या कार्यक्रमाला मर्यादित लोकच उपस्थित राहतील. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कंपनीने निवडक मीडिया सदस्यांना आमंत्रित केले आहे. मात्र, प्रत्येकजण हा कार्यक्रम ऑनलाइन पाहू शकतो. हा कार्यक्रम ऑनलाइन देखील प्रसारित केला जाईल. Apple इव्हेंटसाठी लाइव्ह स्ट्रीमिंग Apple.com, Apple चे YouTube चॅनेल आणि Apple TV अॅपवर उपलब्ध असेल. खाली दिलेल्या लिंक द्वारे तुम्ही ते पाहू शकता-
अॅपल यावर्षी अनेक नवीन उपकरणे लाँच करणार असल्याचे सांगितले जात आहे. कंपनी आज चार नवीन iPhone सादर करू शकते - 6.1-इंचाचा iPhone 14, 6.7-inch iPhone 14, 6.1-inch iPhone 14 Pro आणि 6.7-इंचाचा iPhone 14 Pro max. यावर्षी प्रो मॉडेल नवीन डिझाइनसह सादर केले जाऊ शकते. असे म्हटले जात आहे की, कंपनी आयफोन मिनी श्रेणी हटवेल आणि यावेळी मोठ्या फोनवर लक्ष केंद्रित करेल. नवीन आयफोन 14 सिरीज मोठी बॅटरी, चांगले कॅमेरे आणि Apple च्या नेक्स्ट जनरेशन A16 चिपसह येण्याची अपेक्षा आहे. हे फीचर्स केवळ प्रीमियम मॉडेलमध्ये दिले जाऊ शकतात.
यासोबतच, Apple तीन नवीन स्मार्टवॉच लाँच करू शकते आणि 2019 लाँच एअरपॉड्स प्रो मध्ये अपग्रेड करू शकते. वॉच 8 सिरीजमध्ये ruggedप्रो व्हेरिएंट मिळण्याची अपेक्षा आहे, जी हायकर्स आणि बाइकर्स यांसारख्या मोठ्या क्रीडाप्रेमींसाठी असेल. याशिवाय ऍपल वॉच प्रो मॉडेल अधिक चांगल्या डिझाइनसह आणि उच्च किंमत टॅगसह येण्याची अपेक्षा आहे. Apple चे नवीन वायरलेस इयरबड्स- ज्याला Airpods Pro 2 म्हणतात- ते देखील आज सादर केले जातील. (हेही वाचा: Whats App: आता व्हॉट्स अॅपचा नवा प्रायवेसी अपडेट, प्रत्येक वापरकर्त्याला पुरवणार डिजीटल झेड सिक्युरिटी)
दरम्यान, आतापर्यंत Apple iPhone 14 सीरीजच्या किंमतीशी संबंधित अनेक अहवाल समोर आले आहेत. त्यांच्या मते, हँडसेटच्या प्रो-सिरीजची किंमत 15% जास्त असू शकते. iPhone 14 लाँच केल्यानंतर कंपनी iPhone 13 स्वस्त करू शकतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)