Apple Event 2023 Date and Time: आज लॉन्च होणार्‍या iPhone 15 मध्ये काय असेल? जाणून घ्या अ‍ॅपल इव्हेंट कधी, कुठे, कसा बघाल

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मध्ये Cupertino येथे iPhone 15 launch चं आयोजन करण्यात आले आहे.

Apple (Apple / Twitter)

अ‍ॅपल (Apple) कडून आज (12 सप्टेंबर) iPhone 15 लॉन्च केला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी त्याचा इव्हेंट सुरू होणार आहे. जगभरातील अ‍ॅपल प्रेमी हा इव्हेंट युट्युबवर लाईव्ह पाहू शकणार आहे. दरम्यान आयफोन 15 मध्ये नेमके कोणकोणते फीचर्स असतील याची उत्सुकता अनेकांना आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार आयफोन 15 मध्ये Android सारखा चार्जिंग पोर्ट असू शकतो, बॅटरी कॅमेरा झूम असू शकतो. तज्ञांच्या मते, नव्या फीचर्समुळे ग्राहकांच्या खिशाला चाट पडू शकतो.

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मध्ये Cupertino येथे iPhone 15 launch चं आयोजन करण्यात आले आहे. आयफोन 15 सोबतच या सोहळ्यामध्ये Watches, AirPods आनि अन्य उपकरणं देखील अपडेट करून लॉन्च होतील. हा इव्हेंट Apple TV तसेच अ‍ॅपल च्या अधिकृत युट्युब चॅनेलवर पाहता येणार आहे. Apple Alert: झोपताना iPhone जवळ ठेवून चार्ज करत असाल तर व्हा सावध; कंपनीने जारी केला इशारा .

अ‍ॅपल इव्हेंट इथे पहा  

iPhone 15 बाबतच्या अपेक्षा