Amazon Prime Day Sale 2021: iPhone 11, OnePlus 9R, Galaxy M31s या स्मार्टफोन्सवर 40% सूट; लॅपटॉप्सवर जबरदस्त डिस्काऊंट
26 जुलै पासून या सेलला सुरुवात होईल. या सेल अंतर्गत स्मार्टफोन्स, लॅपटॉपवर डिस्काऊंट दिला जाणार आहे.
ग्लोबल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनने (Amazon) प्राईम डे सेल 2021 (Prime Day Sale 2021) ची घोषणा केली आहे. 26 जुलै पासून या सेलला सुरुवात होईल. या सेल अंतर्गत स्मार्टफोन्स, लॅपटॉपवर डिस्काऊंट दिला जाणार आहे. यात स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर 40 टक्के सूट तर इतर इलेक्ट्रानिक्सवर 60 टक्के डिस्काऊंट देण्यात येणार आहे. यासाठी कंपनीने एचडीएफसी बँकेसोबत हातमिळवणी केली आहे. एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) क्रेडिट आणि डेबिट कार्डवरुन पेमेंट (Credit & Debit Card) केल्यास 10 टक्के इंस्टट डिस्काऊंट दिला जात आहे. याशिवाय अॅमेझॉन पे आयसीआसीआय बँक क्रेडिट कार्ड्सवरुन (Amazon Pay ICICI Bank Credit Cards) खरेदी केल्यास प्राईम मेंबर्संना 5 टक्के रिव्हार्ड पाईंट्स दिले जात आहेत.
वनप्लस नॉर्ड सीई 5जी, रेडमी नोट 10एस, सॅमसंग गॅलेक्सी एम31एस, आयफोन 11, गॅलेक्सी एम51, वनप्लस 9आर 5जी, वनप्लस 9 आणि आयक्यूओओ झी3 या स्मार्टफोन्सवर प्राईम डे सेल अंतर्गत चांगल्या ऑफर्स दिल्या जात आहेत.
त्याचबरोबर HP Pavilion gaming laptop, Sony WF-1000XM3, Fujifilm Instax Mini 11, Lenovo Tab M10 FHD, Asus AIO - AMD Athlon आणि इतर लॅपटॉप्सवर आकर्षक ऑफर्स आणि बंपर डिस्काऊंट दिला जात आहे.
अॅमेझॉन प्राईम डे मेंबर्संना या सेल अंतर्गत स्पिकर्सवर 75 टक्के डिस्काऊंट, स्मार्टवॉचवर 50 टक्के डिस्काऊंट, टॅबलेटवर 75 टक्के तर प्रिंटर्सवर 50 टक्के डिस्काऊंट दिला जात आहे. तसंच Fire TV Stick, Lenovo Tab M10 FHD आणि टेलिव्हीजन सेट्सवर देखील चांगल्या ऑफर्स दिल्या जात आहेत.