Amazon Investment in Bharti-Airtel: भारती-एअरटेलमध्ये मोठा हिस्सा विकत घेणार अ‍ॅमेझॉन? 15,000 कोटींमध्ये होऊ शकतो करार- रिपोर्ट

मुकेश अंबानी यांच्या (Mukesh Ambani) जिओमध्ये (Jio) फेसबुक (Facebook) ने गुंतवणूक केल्यानंतर, आता अमेरिकेची ई-कॉमर्स कंपनी Amazon, भारतीय दूरसंचार कंपनी भारती एअरटेल (Bharti Airtel) मध्ये 2 अब्ज डॉलर्सची (जवळजवळ 15000 कोटी) गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहे.

Airtel posters. (Photo Credit: PTI)

मुकेश अंबानी यांच्या (Mukesh Ambani) जिओमध्ये (Jio) फेसबुक (Facebook) ने गुंतवणूक केल्यानंतर, आता अमेरिकेची ई-कॉमर्स कंपनी Amazon, भारतीय दूरसंचार कंपनी भारती एअरटेल (Bharti Airtel) मध्ये 2 अब्ज डॉलर्सची (जवळजवळ 15000 कोटी) गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहे. सध्या, याबाबतच्या खरेदी करण्याच्या कराराची चर्चा अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे, मात्र लवकरच हा सौदा पूर्ण होऊ शकतो. जर या करारावर पूर्ण सहमती झाली तर Amazon सध्याच्या किंमतीवर सुमारे 5 टक्के हिस्सा खरेदी करू शकेल.

भारती एअरटेलचा प्रतिस्पर्धी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डिजिटल प्लॅटफॉर्म जियोवर जागतिक कंपन्या आपली बाजी लावत असताना, अ‍ॅमेझॉन आणि भारती एअरटेल यांच्यातील कराराची चर्चा सुरू झाली आहे. मात्र सध्या तरी या कराराबाबत कोणतीही माहिती उघड झाली नाही. भारती एअरटेलने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ते सर्व डिजिटल कंपन्यांसह नियमितपणे, आपली उत्पादने, गोष्टी आणि सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात, त्याव्यतिरिक्त त्यांना काही सांगायचे नाही.

Amazon साठी भारत एक प्रमुख बाजारपेठ आहे आणि या बाजारात खोलवर प्रवेश करण्यासाठी, कंपनी देशात सातत्याने गुंतवणूक करीत आहे. Amazon ची भारतात 650 दशलक्ष (सुमारे 48,000 कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची योजना आहे. याआधी Amazon ने फ्लिपकार्ट खरेदी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर हा करार झाला तर एअरटेलला खूप मदत होईल,  कारण या रकमेसह एअरटेल आपल्या विस्तारीकरणावर भर देऊ शकेल. (हेही वाचा: Mitron App नंतर आता Remove China App ही Google Play Store वर करतंय हकालपट्टीचा सामना)

दरम्यान, फेसबुकनंतर गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि आता अ‍ॅमेझॉन या कंपन्यांनी भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीत गुंतवणूक केली असून, सध्या या बड्या तंत्रज्ञान कंपन्यांना भारतातील भविष्यातील डिजिटल अर्थव्यवस्था आकर्षित करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now