Reliance Jio वरून भारतातील कोणत्याही नेटवर्कवर 1 जानेवारी 2021 पासून voice calls होणार फ्री!
जिओने दिलेल्या माहितीनुसार, टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन द्वारा जिओ ला भारतामध्ये डिजिटल सोसायटीचा पाया रचण्याची इच्छा आहे.
Jio New Tariff: रिलायंस जिओ (Reliance Jio) कडून आज एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. प्रेस रीलीज जारी करत दिलेल्या माहितीनुसार रिलायंस जियोच्या ग्राहकांना नव वर्षाच्या पहिल्याचं दिनी मोठं गिफ्ट मिळालं आहे. रिलायंस जिओच्या ग्राहकांना आता 1 जानेवारी 2021 पासून सार्या इतर टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कवर मोफत व्हॉईस कॉल दिले जाणार आहेत. interconnect usage charges रद्द केले जाणार आहेत. त्यामुळे हे जिओच्या ग्राहकांसाठी 2021 मधील एक मोठं गिफ्ट असणार आहे. रिलायंसच्या ग्राहकांसाठी ऑन नेट डोमेस्टिक व्हॉईस कॉल्स हे जिओ नेटवर्कवर यापूर्वीपासूनच फ्री होते.
सप्टेंबर2019 मध्ये जेव्हा TRAI ने बिल लागू करण्यासाठी जानेवारी 2020 नंतरची वेळ दिली होती तेव्हा जिओला त्यांच्या ग्राहकांना ऑफ नेट व्हॉईस कॉल्स साठी पैसे आकारणं बंधनकारक होते. त्यावेळेस त्यांनी IUC charge प्रमाणे ते आकारण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे तसे करताना जिओने त्यांच्या ग्राहकांना दिलेल्या माहितीनुसार, हे केवळ तोपर्यंत लागू राहणार होते जो पर्यंत TRAI IUC charges काढून टाकत नाहीत. रिलायन्स जिओ कंपनीच्या IUC वाउचरमध्ये कॉलिंगसाठी 14, 074 मिनिटे फ्री, किंमत 10 रुपयांपासून सुरु.
इंटरकनेक्ट यूसेज चार्ज म्हणजे काय?
दरम्यान इंटरकनेक्ट यूसेज चार्ज (IUC) हा तो चार्ज असतो जो एक टेलिकॉम ऑपरेटर दुसर्या टेलिकॉम कंपनीला देते. हा तेव्हा दिला जातो जेव्हा कोणता ग्राहक त्याच्या ऑपरेटर कडून दुसर्या ऑपरेटरच्या ग्राहकाला कॉल करतो. 2 वेगवेगळ्या नेटवर्क दरम्यान केल्या जाणार्या कॉल्सला मोबाईल ऑफ नेट कॉल्स असं देखील म्हटलं जातं.
Reliance Jio ने एकूण 2.22 मिलियन नवे मोबाईल कस्टमर्स जोडले आहेत. तर त्यांचा ऑक्टोबर पर्यंतचा एकूण सब्सस्क्रायबर्सचा डाटा 406.3 मिलियन पर्यंत पोहचला आहे. दरम्यान जिओने दिलेल्या माहितीनुसार, टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन द्वारा जिओ ला भारतामध्ये डिजिटल सोसायटीचा पाया रचण्याची इच्छा आहे. समाजातील सार्या स्तरातील लोकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून कमीत कमी खर्चात जगभराशी कनेक्ट ठेवण्याचा प्रयत्न आहे.