Airtel च्या प्रीपेड ग्राहकांनाही मिळणार Amazon Prime चे फ्री सब्सक्रिप्शन
भारतीय टेलीकॉम कंपनी एअरटेल पुन्हा एकदा युजर्ससाठी नवा प्रोग्रॅम सादर केला आहे.
भारतीय टेलीकॉम कंपनी एअरटेल (Airtel) पुन्हा एकदा युजर्ससाठी नवा प्रोग्रॅम सादर केला आहे. #AirtelThanks असे या प्रोग्रॅमचे नाव असून या अंतर्गत ग्राहकांना विशेष ऑफर्स देण्यात येणार आहेत. याचे सिल्वर, गोल्ड आणि प्लेटिनम असे तीन टप्पे आहेत. AirtelThanks मध्ये ग्राहकांना डिव्हाईस सिक्युरिटी आणि व्हिआयपी कॉनेट्सपासून सरप्राईज ऑफर्स मिळणार आहेत. यात एअरटेल युजर्सला अॅमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, Zee5 आणि Wynk Music याचे सब्सक्रिप्शन मिळू शकतं. त्याचबरोबर कंपनीने 299 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे त्यात तिला दररोज 2.5 जीबी डेटा मिळेल.
एअरटेलच्या 299 रुपयांच्या प्री पेड प्लॅन अंतर्गत ग्राहकांना दररोज 2.5 जीबी डेटा मिळेल. त्याचबरोबर अॅमेझॉन प्राईमचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. यात अनलिमिटेड कॉलिंगसह 100 एसएमएस ची सुविधा देण्यात आली आहे. याची व्हॅलिडीटी 28 दिवसांची असेल. आतापर्यंत पोस्टपेट युजर्सला मिळत असलेली ही सुविधा आता प्री पेड युजर्ससाठी देखील सुरु करण्यात आली आहे.
#AirtelThanks प्रोग्रॅमसाठी कंपनीने अॅमेझॉन, नेटफ्लिक्स आणि जी5 सोबत हातमिळवणी केली. प्लॅटिनम अंतर्गत ग्राहकांसाठी एअरटेलच्या वतीने व्हीआयपी सुविधा मिळेल. यात प्रिमियर कन्टेंट, ई-बुक्स, डिव्हाईस प्रोटक्शन आणि सेलसाठी अग्रिम एंट्री यांसारख्या सुविधा मिळतील. तर सिल्वर प्लॅनअंतर्गत ग्राहकांना एअरटेल टीव्ही आणि Wynk वर बेसिक कन्टेंट मिळेल. तर गोल्ड ग्राहकांना देखील सिल्वर वाली सुविधा मिळेल. #AirtelThanks कम्पेनचा फायदा 199 रुपये किंवा याहून अधिक रिचार्ज करणाऱ्या सर्व प्री-पेड ग्राहकांना मिळेल.