Airtel Digital TV Partners with Amazon Prime: एअरटेल डिजिटल टीव्हीची ॲमेझॉन प्राइमसोबत भागीदारी; मिळणार लाइव्ह टी.व्ही आणि प्राइम लाइट फायदे, जाणून घ्या प्लॅन्सच्या किंमती

या ऑफरद्वारे एअरटेलने 350+ टी.व्ही चॅनल्स अमर्याद उपलब्ध करून देण्यासह, घरगुती मनोरंजनात सुधार करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे आणि त्यात प्राइम व्हिडिओवर उपलब्ध असलेल्या कंटेंटचा समावेश आहे.

Airtel Digital TV Partners with Amazon Prime (संग्रहित संपादित प्रतिमा)

Airtel Digital TV Partners with Amazon Prime: एअरटेल डिजिटल टी.व्हीने आपल्या नवीन अल्टिमेट आणि ॲमेझॉन प्राइम लाइट प्लॅनच्या अंतर्गत लाइव्ह टी.व्ही आणि प्राइम लाइट फायदे उपलब्ध करून देण्यासाठी ॲमेझॉन प्राइम सोबत हातमिळवणी केली आहे. या प्लॅनच्या सबस्क्राइबर्सना एच.डी क्वालिटीच्या 2 डिव्हाइसवर प्राइम व्हिडिओद्वारे अप्रतिम मनोरंजनाचा आनंद घेता येणार आहे. प्राइम लाइट सबस्क्रिप्शनमध्ये इतर प्राइम फायदे सुद्धा सामील आहेत. यामध्ये, 10 लाखांहून अधिक उत्पादनांवर मोफत अमर्यादित त्याच दिवशी डिलिव्हरी, ॲमेझॉनवर 40 लाख+ उत्पादनांवर दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी, लाइटनिंग डील्स लवकर उपलब्ध होणे आणि ॲमेझॉन पे आय.सी.आय.सी.आय बँक क्रेडिट कार्डद्वारे Amazon.in वर खरेदी केल्यावर 5% कॅशबॅक, यांचा समावेश आहे.

एअरटेल डिजिटल टी.व्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिद्धार्थ शर्मा, म्हणाले की, ‘मोबाइल मनोरंजनात मागणी वाढत जात आहे आणि त्याने आम्हाला आमच्या टी.व्ही ऑफरचा विस्तार करण्यास प्रवृत्त केले आहे. ॲमेझॉन प्राइमसोबत आमच्या भागीदारीमुळे आमची कंटेंट श्रेणी (लाइनअप) वाढत चालली आहे. ही बाब आमच्या विविध प्रकारच्या घरगुती मनोरंजन सेवांना पूरक ठरत आहे. आम्ही ग्राहकांना एक अप्रतिम अनुभव देण्यासाठी उत्सुक आहोत, ज्याची किंमत मराठी कंटेंटसाठी 508 रुपयांपासून सुरू होते. (हेही वाचा: YouTube TV-focused Tools: यूट्यूबकडून निर्मात्यांसाठी नवीन टीव्ही-केंद्रित साधने लाँच; जाणून घ्या तपशील)

नवीन प्लॅन्सच्या किंमती-

मराठी अल्टिमेट आणि ॲमेझॉन प्राइम लाइट (30 दिवस)- 508 रुपये

मराठी अल्टिमेट आणि ॲमेझॉन प्राइम लाइट (180 दिवस)- 2192 रुपये

या ऑफरद्वारे एअरटेलने 350+ टी.व्ही चॅनल्स अमर्याद उपलब्ध करून देण्यासह, घरगुती मनोरंजनात सुधार करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे आणि त्यात प्राइम व्हिडिओवर उपलब्ध असलेल्या कंटेंटचा समावेश आहे.