Airtel Mobile Tariff Hike: ग्राहकांना झटका; एअरटेलची मोबाइल सेवा महागली
या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला 100 एसएमएसचा लाभ मिळू शकतो.
एअरटेलने त्यांचे नवीन मोबाईल प्लॅन्स जाहीर केले आहेत. हे नवीन शुल्क दर Bharti Hexacom Ltd. सह सर्व ग्राहकांना लागू होतील. एअरटेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सर्व योजनांसाठीचे नवीन शुल्क दर 3 जुलैपासून लागू होणार आहेत. काल रिलायन्स जिओ कंपनीने त्यांच्या मोबाइल सेवांचे दर वाढवून, नवीन यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ आता एअरटेलनेही आपली सेवा महाग केल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार हे निश्चित झाले आहे.
पाहा पोस्ट -
नव्या एअरटेलच्या प्लॅननूसार 265 रुपयांच्या प्लॅनचे शुल्क 299 रुपये करण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला 100 एसएमएसचा लाभ मिळू शकतो. तर 299 रुपये प्लॅनच्या शुल्कात वाढ करून, ते 349 करण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1.5 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला 100 एसएमएस दिले जातील. 359 रुपयांचा प्लॅन 409 रुपये करण्यात आला आहे. त्यामध्ये तुम्हाला 2.5 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला 100 एसएमएस इत्यादी फायदे मिळतील. 399 रुपये प्लॅनचे शुल्क 449 रुपये करण्यात आले आहे. त्यामध्ये ग्राहक 3 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला 100 एसएमएसचा लाभ घेऊ शकतात.