Airtel ग्राहकांसाठी खुशखबर! 5G सेवा झाली लाइव, युजर्सला मिळणार जबरदस्त इंटरनेट स्पीडचा अनुभव
Airtel 5G सर्विस 1800MHz बँडवर लाइव केली गेली आहे जी NSA (Non Stand Alone) टेक्नोलॉजीवर काम करते.
भारतीय बाजारात अगदी कमी कालावधीत अनेकांची मनं जिंकणारी टेलिकॉम कंपनी एअरटेल ने आपल्या युजर्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. एअरटेल आपली 5G इंटरनेट सेवा लाईव केली आहे. यामुळे आता इंटरनेटचा स्पीड आणखी दुप्पट होणार आहे. थोडक्यात आता एअरटेलची 5G इंटरनेट सेवा सुसाट धावणार असं म्हणायला हरकत नाही. नुकताच एअरटेल कंपनीने आपल्या युट्यूब पेज याचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. Airtel 5G सर्विस हैदराबादमध्ये कर्मशियली लाइव केली आहे. कंपनीच्या CEO चे म्हणणे आहे की, स्पेक्ट्रम अलॉटमेंटसह Airtel 5G सर्विस सुरु केली जाऊ शकते.
कंपनीच्या CEO ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीजवळ 5G Ready नेटवर्क इकोसिस्टम आहे. Airtel 5G सर्विस 1800MHz बँडवर लाइव केली गेली आहे जी NSA (Non Stand Alone) टेक्नोलॉजीवर काम करते.हेदेखील वाचा- Google Chrome New Update: गुगल क्रोम मध्ये आले नवे 'पासवर्ड प्रोटेक्शन फिचर', कसे कराल अपडेट?
कंपनीने या 5G सेवेला डायनॅमिक नेटवर्क स्पेक्ट्रम शेअरिंग टेक्नोलॉजीसह टेस्ट केले आहे. कंपनीने असा दावा केले आहे की, एअरटेल भारतामध्ये 5G नेटवर्क ला टेस्ट करणारी पहिली टेलिकॉम प्रोवाइडर कंपनी ठरली आहे. आतापर्यंत अन्य कोणत्याही कंपनीने भारतात 5G सर्विसेसला टेस्ट केलेले नाही. त्यामुळे एअरटेलचे हे एक यशस्वी पाऊलच म्हणावे लागेल.
एअरटेलचे 5G सर्विसचा स्पीड हा 4G पेक्षा 10 पट जास्त असेल. हैदराबादमध्ये हा स्पीड तपासणा-या एअरटेल कंपनीने असा दावा केला आहे की, या 5G नेटवर्कवर तुम्ही पूर्ण लेन्थ HD चित्रपट डाऊनलोड करु शकता. यात 3Gbps पर्यंत डाउनलोडिंग स्पीड मिळू शकते. एअरटेल आपल्या 5G सेवेटा डेमोनस्ट्रेशन हैदराबादच्या माधवपुर Airtelk Store मध्ये देत आहे. यूजर तेथे भेट देऊन Airtel 5G सेवेचा अद्भूत अनुभव घेऊ शकतात.