Acer Swift 3 Notebook भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Acer कंपनीने भारतीय बाजारात त्यांचा नवा लॅपटॉप Swift 3 Notebook लॉन्च केला आहे. नोटबुक वजनाने हलका आणि स्लिम असणार आहे. या लॅपटॉपमध्ये 14 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

Acer (Photo Credits-Twitter)

Acer कंपनीने भारतीय बाजारात त्यांचा नवा लॅपटॉप Swift 3 Notebook लॉन्च केला आहे. नोटबुक वजनाने हलका आणि स्लिम असणार आहे. या लॅपटॉपमध्ये 14 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. भारतातील हा पहिला असा लॅपटॉप असून जो AMD Ryzen 4000 Series मोबाईल प्रोसेसरवर लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये काही फिचर्स सुद्धा युजर्सला मिळणार आहेत. तर जाणून घ्या या लॅपटॉपची किंमत आणि दमदार फिचर्स काय असणार आहेत.

Acer Swift 3 Notebook भारतात 59,999 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आला आहे. हा लॅपटॉप ग्राहकांना ई-स्टोर किंवा अधिकृत रिटेल स्टोअर मधून खरेदी करता येणार आहे. लॉन्चसह हा सेलसाठी सुद्धा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या लॅपटॉपसाठी फक्त सिल्वर रंग उपलब्ध करुन दिला आहे. लॅपटॉपच्या फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास त्यामध्ये आयपीएस टेक्नॉलॉजीसह 14 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. याच्या स्क्रिनचे रेजोल्यूशन 1920x1080 पिक्सल असून यामध्ये 82.73 टक्के स्क्रिन टू बॉडी रेश्यो दिला आहे. यामध्ये AMD Ryzen 5 4500U प्रोसेसर देण्यात येणार आहे. कंपनीचा असा दावा आहे की, भारतामधील हा असा पहिला लॅपटॉप असून AMD Ryzen 4000 Series मोबाईल प्रोसेसरसह लॉन्च केला आहे.(1 जून पासून Flipkart वर सुरु होणार सेल, ग्राहकांना खरेदीवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार)

नोटबुकमध्ये 16GB रॅम आणि 1TB SSD देण्यात आला आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, याची बॅटरी 11 तास कायम राहू शकते. तसेच फास्ट चार्जिंगची यामध्ये क्षमता असून 30 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये 4 तासापर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देण्यासाठी सक्षम आहे. हा लॅपटॉप Windows 10 आणि Microsoft Office 2019 सह येणार आहे. यामध्ये DTS Audio दिला गेला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now