6G Internet Services: आता 5G पाठोपाठ देशात 6G इंटरनेट सर्विस सुरु होणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2030 पर्यंत भारतात 6G इंटरनेट सेवा सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Central Minister Ashwini Vaishnav) यांनी कालचं 12 ऑक्टोबर पासून भारतात 5G सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असेल, अशी अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे. भारतीय यूजर्स 5G सर्विसच्या प्रतिक्षेत आहे. पण भारतीयांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार असुन आता भारतात 5G इंटरनेट सेवा वापरता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव (5G Spectrum Auction) पार पडला आहे. या लिलावात देशातील मोठमोठ्या टेलिकॉम कंपन्या (Telecom Company) सहभागी झालेल्या होत्या.तरी पंतप्रधान मोदींकडून (PM Modi) आता थेट 6G इंटरनेट सर्विसबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.
अवघ्या महिना भरात देशात 5G इंटरनेट सर्विस सुरु होत असली तरी 2030 पर्यंत भारतात 6G इंटरनेट सेवा सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन’ (Smart India Hackathon 2022) या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) बोलत असताना त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत देशात 6G लाँच (Launch) करण्याची तयारी करत आहोत. सरकार इंटरनेट सेवांबाबत जी गुंतवणूक (Investment) करत आहेत, त्याचा सर्व तरुणांनी लाभ घ्यावा, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. (हे ही वाचा:- iPhone 14 Launch Date: iPhone14 लॉन्चचा मुहूर्त ठरला, पुढील काही दिवसात आयफोन 14 बाजारात खरेदीसाठी उपलब्ध)
तरी देशातील जनतेला सध्या 5G इंटरनेट सर्विसची प्रतिक्षा आहे. सध्या काही राज्यांच्या काही शहरांमध्ये 5G सर्विस (Service) सुरु करण्यात येत असली तरी येत्या दोन ते तीन वर्षांत 5G देशाच्या प्रत्येक भागात पोहोचावे अशी आमची अपेक्षा आहे, असही अश्विणी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी सागितलं आहे. तसेच सुरु करण्यात येणारी असलेली 5G सेवा किफायती दरात सुरु करण्यात येणार आहे. म्हणजे सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात 5G सेवा देण्यात येईल. तसेच फक्त शहरी (Urban) भागातच नाही तर ग्रामीण (Rural) भागात देखील 5G सर्विस पोहचवण्याचा आमचा मानस आहे, असं अश्विणी वैष्णव यांनी सांगितलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)