Zimbabwe vs Pakistan 2nd T20I 2024 Live Streaming: झिम्बाब्वेला पराभूत करून मालिका काबीज करण्याचे पाकिस्तानचे लक्ष्य; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
झिम्बाब्वे-पाकिस्तान यांच्यातील दुसरा टी20 सामना मंगळवारी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहे. पहिल्या टी 20 मध्ये पाकिस्तानने झिम्बाब्वेचा 57 धावांनी पराभव केला.
Zimbabwe National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 2nd T20I 2024 Live Streaming: झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान (Zimbabwe vs Pakistan) यांच्यातील दुसरा टी 20 सामना मंगळवारी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहे. पहिल्या टी 20 मध्ये पाकिस्तानने झिम्बाब्वेचा 57 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 4 गडी गमावून 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 108 धावांवर गारद झाला. पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेच्या नजरा मालिकेत पुनरागमनाकडे असतील. दुसरा सामना जिंकून पाकिस्तानला मालिका जिंकायची आहे.(हेही वाचा:Bangladesh Women vs Ireland Women, 3rd ODI Match Live Streaming In India: बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना; कधी, कुठे आणि कसा पहाल थेट सामना?)
दुसरा टी 20 कधी होणार?
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा टी 20 मंगळवार, 3 डिसेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो येथे खेळवला जाईल. तर नाणेफेक अर्धा तास आधी होणार आहे.
दुसरा टी 20 सामना कुठे पाहायचा?
भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेचे प्रसारण होणार नाही. झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान टी 20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून दुसऱ्या टी 20 चा आनंद घेता येईल.
दोन्ही संघांचे खेळाडू
झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ट्रेवर ग्वांडू, क्लाइव्ह मदांडे, वेस्ली माधवेरे, टिनोटेंडा माफोसा, तदिवानशे मारुमनी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्रँडन मावुथा, ताव्वा, ब्रँडन मावुता, ता. मुझाराबानी, डायोन मायर्स, रिचर्ड नगारावा
पाकिस्तान संघ: सलमान अली आगा (कर्णधार), अहमद डॅनियल, अराफत मिन्हास, हारिस रौफ, हसीबुल्ला, जहांदद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, मुहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसूफ, कासिम अक्रम, साहिबजादा फरहान, सुफियान मोकीम, तय्यब ताहिर, उस्मान खान
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

