Yuvraj Singh: युवराज सिंग बनला विराट कोहलीचा शेजारी, अलिशान घराची किंमत वाचून माहितेय?
त्याच इमारतीत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं देखील घर आहे. युवराजच्या या नवीन घराची किंमत 64 कोटी रुपये आहे.
Yuvraj Singh: टीम इंडियाचा माजी फलंदाज युवराज सिंग आणि पत्नी हेजल कीच (Yuvraj Singh And Hazel Keech) यांनी मुंबईमध्ये नवीन घर विकत (Yuvraj Singh New House) घेतलंय. युवराजचा हा आलिशान फ्लॅट ज्या इमारतीत आहे. त्याच इमारतीत विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा(Anushka Sharma) यांचं देखील घर आहे. युवराजच्या या नवीन घराची किंमत 64 कोटी रुपये आहे. युवराजच्या या फ्लॅटमध्ये अनेक सुविधा आहेत. तो फ्लॅट 16 हजार स्क्वेअर फूटमध्ये आहे. (हेही वाचा: IND vs BAN 1st T20I Weather Update: भारत-बांगलादेश पहिल्या टी-20 सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? एका क्लिकवर वाचा हवामान रिपोर्ट)
युवराज सिंग आणि हेजल कीच यांनी मुंबईत नवीन फ्लॅट खरेदी केलाय. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा ज्या इमारतीत फ्लॅट आहे, त्याच इमारतीत युवराजने फ्लॅट घेतलाय. युवराजचा फ्लॅट 29व्या मजल्यावर आहे. तर कोहली या इमारतीच्या ३५व्या मजल्यावर राहतो. युवराज आणि हेजल यांच्या नवीन फ्लॅटची लिव्हिंग रूम सुंदर पेंटिंगने सजलेली आहे. इंटिरियर डिझायनरने फ्लॅटच्या कोपऱ्यांवर उत्कृष्ट काम केले आहे. युवीच्या बाल्कनीतून मुंबई शहराचं अप्रतिम दृश्य दिसतं. युवराज आणि हेजलला खेळांची खूप आवड आहे. त्यांच्या फ्लॅटमध्ये एक वेगळा गेम झोन आहे.
युवराज आणि हेजलच्या नवीन फ्लॅटच्या भिंतींना पांढऱ्या रंग दिलेला असून अप्रतिम रचना करण्यात आलीय. युवराजच्या या फ्लॅटची किंमत सुमारे 64 कोटी रुपये आहे. ही किंमत विराट कोहलीच्या घराच्या जवळपास दुप्पट आहे. एकाच इमारतीत असून देखील कोहलीच्या फ्लॅटची किंमत 34 कोटी रुपये आहे. त्यांचा बेडरूम देखील पाहण्यासारखी आहे. बेडरूममध्ये चमकदार मार्बलचा वापर करण्यात आलाय.