Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमधील चुरशीच्या हॉकी सामन्यात महिला संघाचा परभव, कांस्य पदकाचे स्वप्न भंगले

भारतीय महिला संघाला (Indian Womens hocky team) कांस्यपदक (Bronze medal) जिंकता आले नाही. ग्रेट ब्रिटनने (Great Britain) हा सामना 4-3 ने जिंकला. भारताने मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) इतिहास घडवण्यात यश मिळवले आहे.

भारत महिला हॉकी टीम (Photo Credit: Twitter)

भारतीय महिला संघाला (Indian Womens hocky team) कांस्यपदक (Bronze medal) जिंकता आले नाही. ग्रेट ब्रिटनने (Great Britain) हा सामना 4-3 ने जिंकला. भारताने मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) इतिहास घडवण्यात यश मिळवले आहे. नवा इतिहास रचण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ मैदानात उतरला होता. भारतीय महिला हॉकी संघ प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकासाठी लढला आहे. हे आव्हान भारतासाठी सोपे नव्हते. भारतासमोरचे आव्हान ग्रेट ब्रिटनला होते.  ग्रेट ब्रिटनने ग्रुप स्टेज सामन्यात भारताचा 4-1 असा पराभव केला होता. मात्र चुकांमधून धडा घेतल्यानंतर भारतीय संघाला पुनरागमन करण्याची मोठी संधी आता होती. भारत आणि ग्रेट ब्रिटनचे संघ मैदानात उतरले. भारतीय महिला संघ इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला होता. राणी रामपालच्या नेतृत्वाखालील संघाला ऑलिम्पिकमध्ये प्रथमच कांस्यपदक जिंकण्याची संधी होती. सामन्याच्या सुरुवातीला ब्रिटनकडे चेंडू गेला. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला ब्रिटनने पेनल्टी कॉर्नर मिळवला.  ब्रिटनला सामन्याचा पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. आता सर्वांच्या नजरा सविता पुनियावर लागल्या होत्या. त्यानंतर भारताने पेनल्टी कॉर्नरचा यशस्वी बचाव केला.

दोन्ही संघांना पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये सुरुवातीला भारत मागे पडला. दुसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या मिनिटाला ब्रिटनने गोल केला. ब्रिटन 1-0 ने पुढे गेला होता. भारताकडूनही हल्ला सुरू झाला. भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर होऊ शकले नाही. ब्रिटनने आता दुसरा गोल केला. ब्रिटनच्या हल्ल्यापुढे सविता पुनियासमोर संधी नव्हती. भारतासाठी आव्हान वाढत जात होतं. ब्रिटन आता 2-0 ने पुढे गेला होता.

भारताने पहिला गोल केला. तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर झाले. गुरजीत कौरने सामन्यात भारताला परत आणले दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस भारताने शानदार पुनरागमन केले. भारताने सामना 2-2 असा बरोबरीत आणला. गुरजीत कौरने भारतासाठी दुसरा गोल केला. गुरजीत कौरने पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. भारतासाठी हे खूप चांगले पुनरागमन होते. त्यानंतर लगेच भारताने तिसरा गोल केला. मध्यंतरापर्यंत भारताने 3-2 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या तिमाहीत भारत 0-2 ने पिछाडीवर होता. पण शानदार पुनरागमन करत भारत 3-2 ने परतला. नंतर भारताला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे सामना 3-3 ने बरोबरीत आला. ब्रिटन आता 4-3 ने आघाडीवर गेला. दुसऱ्या क्वार्टरपासून भारताला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे भारताचा पराभव होण्यास कारण ठरलं.

ब्रिटनविरुद्ध दोन गोलने पिछाडीवर असूनही भारताने पुनरागमन केले होते. शेवटचे दोन तिमाही मात्र भारतासाठी चांगले नव्हते आणि त्याचा फटका बसला. भारताने हा सामना एका गोलच्या फरकाने गमावला. पुढील ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय महिला हॉकी संघाकडून आणखी चांगल्या कामगिरीची चाहत्यांना अपेक्षा असेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now