Paris Olympic 2024: नेमबाज स्वप्नील कुसळे पुरुषांच्या 50 मीटर रायफल स्पर्धेत अंतिम फेरीत दाखल; पदकासाठीच्या अपेक्षा उंचावल्या
पात्रता फेरीत त्याने 590 गुण मिळवले आणि सातवे स्थान पटकावले.
Paris Olympic 2024: भारताचा स्टार नेमबाज स्वप्नील कुसळे याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पात्रता फेरीत त्याने 590 गुण मिळवले आणि सातवे स्थान पटकावले. पात्रता फेरीतील अव्वल आठ नेमबाज अंतिम फेरीत पोहोचले. स्वप्नील आता उद्या पदकासाठी निशाणा लावताना दिसणार आहे. त्यांचा अंतिम सामना गुरुवारी दुपारी एक वाजता होणार आहे. या स्पर्धेत नेमबाजांना तीन पोझिशनमध्ये लक्ष्य ठेवावे लागते. याच स्पर्धेत आणखी एक भारतीय नेमबाज ऐश्वर्या प्रताप सिंग ११व्या स्थानावर आहे. त्याचा स्कोर 589 होता. (हेही वाचा: Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये विजयासह लव्हलीनाची शानदार सुरुवात, बॉक्सिंगमध्ये पदकाच्या आशा उंचावल्या!)
क्वालिफायर्समध्ये स्वप्नील 7 व्या क्रमांकावर राहिला. त्याने 590 गुण मिळवले. अखेरच्या क्षणी अंतिम फेरीत जाण्यासाठी त्याला फ्रान्सच्या रोमेन ऑफ्रेर आणि झेक प्रजासत्ताकच्या जिरी प्रिरात्स्की आणि पीटर निम्बुरस्की यांच्याकडून आव्हान मिळालं होतं. मात्र त्याने जिरी शेवटच्या क्षणी पिछाडीवर पडला आणि आठव्या क्रमांकावर आला. त्यामुळे स्वप्नीलचं सातवं स्थान पक्कं झालं. दरम्यान जिरीचेही 590 गुण झाले. (हेही वाचा: PV Sindhu Paris Olympic 2024: पीव्ही सिंधू सलग दुसरा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत दाखल)
पोस्ट पहा
याच प्रकारात भारताचा ऐश्वर्य प्राताप सिंग तोमर देखील सहभागी झाला होता. मात्र त्याला 11 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. क्वालिफायर्समधून केवळ 8 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
ऐश्वर्य प्रतापनेही सुरुवात चांगली केली होती. तो पहिल्या 8 मध्येही सातत्याने होता. मात्र शेवटच्या स्टेजला तो पिछाडीवर पडला. विशेष म्हणजे 7 आणि 8 क्रमांकावर राहिलेल्या स्वप्नील आणि जिरीपेक्षा तो फक्त एका गुणाने मागे राहिला. ऐश्वर्य प्रतापचे 589 गुण होते. त्यामुळे तो 11 व्या क्रमांकावर राहिला.