अमानुष! फटाके भरलेलं अननस खाऊ घातल्याने गर्भार हत्तीणीचा मृत्यू; संतप्त शिखर धवन, हरभजन सिंहकडून दोषींना कठोर शिक्षेची मागणी
केरळच्या मलप्पुरममध्ये फटाके भरलेलं अननस खाऊ घातल्याने एका गर्भार हत्तीणीचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन, हरभजन सिंह आणि मिताली राज देखील भडकले.
केरळमध्ये एक अमानुष घटना उघडकीस आली आहे. केरळच्या (Kerala) मलप्पुरममध्ये (Malappuram) फटाके भरलेलं अननस खाऊ घातल्याने एका गर्भार हत्तीणीचा मृत्यू झालाय. यामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तीणीच्या गर्भाशयात वाढणार्या मुलासह तिचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्याने ही वेदनादायक घटना सोशल मीडियावर पोस्ट केली. काही मिनिटातच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लोकांनी संताप व्यक्त केला. स्फोटकांमुळे या हत्तीणीला इतक्या वेदना झाल्या की ती तीन दिवस वेलियार नदीत उभी होती आणि मदतीसाठी निघालेलं पथक तिच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या हत्तीणीने सोंड आणि तोंड पूर्णवेळ पाण्यात बुडवून ठेवलं होतं. पाण्यात उभ्या या हत्तीणीचा 27 मेला मृत्यू झाला. तिचा मृतदेह जवळच्याच एका ठिकाणी नेऊन पोस्टमॉर्टेम करण्यात आल्यावर हत्तीण गर्भार असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. या घटनेमुळे भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन (Shikhar Dhawa), हरभजन सिंह (Harbhajan Singh) आणि मिताली राज देखील भडकले.
या घटनेवर हरभजनने ट्विट केले आणि लिहिले- "त्यांना शिक्षा झाली पाहिजे. या निर्दोष गर्भवती हत्तीणीला कशी शिक्षा देतात."
शिखर धवनने लिहिले, "या निष्पाप प्राण्यांवर अशा क्रूरतेबद्दल ऐकून खरोखर दुःख झाले. या घटनेमुळे खूप निराश आणि अस्वस्थ. दोषींना शिक्षा मिळेल अशी आशा आहे."
भारतीय महिला वनडे संघाची कर्णधार मिताली म्हणाली,"आपण कोणत्या प्रकारचे लोक बदलत आहोत?? दोषींवर कडक कारवाई केलीच पाहिजे!"
साइलेंट व्हॅली नॅशनल पार्कचे वन्यजीव अधिकारी म्हणाले की, खालच्या जबड्यात दुखापतीमुळे हत्तीणीचा वेलियन नदीत उभ्या-उभ्या मृत्यू झाला. अननस खाल्ल्यानंतर जखमी हथिनी नदीत उभी राहिली असं म्हटलं जात आहे. पाण्यामुळे कदाचित तिला थोडासा आराम होणार असेल. उत्तर केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी या गर्भवती हत्तीच्या वेदना आणि अस्वस्थतेचे वर्णन करीत या घटनेवर एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे.