Thailand Open 2019: सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकत रचला इतिहास
भारताच्या पुरुष दुहेरी जोडीने पहिल्यांदा BWF सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली आहे.
थायलंड ओपन (Thailand Open) बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) जोडीने जेतेपद मिळवले आहे. त्यांनी जागतिक जेता ली जुन हुई आणि ल्यू यु चेन या चिनी जोडीचा 21-19, 18-21असा पराभव करून पहिल्यांदा 500 सुपर स्पर्धा जिंकण्याची विक्रमी कामगिरी केली. भारताच्या पुरुष दुहेरी जोडीने पहिल्यांदा बीडब्ल्यूएफ (BWF) सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली आहे. 2018 मध्ये सत्विकराज आणि चिरागच्या जोडीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं. त्यानंतर एखाद्या मोठ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची भारतीय जोडीची ही पहिलीच वेळ ठरली होती.
पुरुष दुहेरचा हा अंतिम सना 1 तास 2 मिनिटे चालला. या सामन्यात सात्विक आणि चिरागने चांगली सुरुवात केली होती. पहिल्या गेममध्ये 10-6 अशी आघाडी मिळवली होती. पण नंतर चीनच्या जोडीने पुनरागमन करत 15-15 अशी बरोबरी साधली. त्यानंतर सात्विक आणि चिरागने चांगला खेळ केला. आणि पहिला रोमांचारी गेम 21-19 असा जिंकला आणि सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये देखील सात्विक आणि चिरागने 5-2 अशी आघाडी घेतली होती. या गेमच्या मध्यंतरापर्यंत 11-9 असे ते आघाडीवर होते. पण हुई आणि चेनच्या जोडी पुनरागम करण्यात केले आणि 14-14 अशी बरोबरी करत दुसरा गेम 21-18 च्या फरकाने जिंकला आणि सामन्यात बरोबरी केली.
अंतिम आणि तिसऱ्या गेममध्ये भारतीय जोडी 3-6 अशी पिछाडी होती. पण नंतर त्यांनी सलग 5 गुण जिंकत 8-6 अशी आघाडी घेतली. अंतिम गुणपर्यंत चीनची जोडी झुंज देत राहिली. पण चिराग आणि सात्विकने आसखेरचा गेम 21-18 अशा फरकाने जिंकला.