मोदी सरकारने सचिन तेंडुलकर-विश्वनाथन आनंद यांना AICS समितीमधून केले बाहेर, जाणून घ्या कोणाचा झाला समावेश
भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने देशातील खेळाच्या विकासाशी संबंधित विषयांवर दिग्गजांशी सल्लामसलत करण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या अखिल भारतीय क्रीडा परिषदेतुन सचिन तेंडुलकर आणि बुद्धिबळ विझार्ड विश्वनाथन आनंद बाहेर करण्यात आले आहे.
भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने देशातील खेळाच्या विकासाशी संबंधित विषयांवर दिग्गजांशी सल्लामसलत करण्याच्या हेतूने डिसेंबर 2015 मध्ये अखिल भारतीय क्रीडा परिषद स्थापन (All India Council of Sports) केली. डिसेंबर 2015 ते मे 2019 पर्यंतच्या या समितीच्या पहिल्या कार्यकाळात क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि बुद्धिबळ विझार्ड विश्वनाथन आनंद (Vishwanathan Anand) यांची राज्यसभेचे खेळाडू-खासदार म्हणून नेमणूक करण्यात अली. मात्र, आता दोंघांनाही बाहेर करण्यात आले आहे. सचिन आणि आनंदच्या व्यतिरिक्त बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद (Pullela Gopichand) आणि फुटबॉलचा माजी कर्णधार बायचुंग भूटिया (Bhaichung Bhutia) यांनाही बाहेर करण्यात आले आहे. सचिन आणि आनंद समितीच्या सभांना उपस्थित राहिले नसल्या कारणाने हा निर्णय घेण्यात असल्याचे समजले जात आहे. दरम्यान, क्रिकेटर हरभजन सिंह आणि 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे सलामी फलंदाज कृष्माचारी श्रीकांत यांचा नवीन सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. आता समितीमधील सदस्यांची संख्याही 27 वरून 18 करण्यात आली आहे.
आनंद आणि सचिन दोघांचाही मे 2019 मध्ये संपलेल्या मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान बनवलेल्या या समितीत समावेश केला गेला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीच्या दोनच बैठकीत उपस्थित राहिलेले तेंडुलकर आणि आनंद (जे अजूनही सर्किटवर कार्यरत आहेत) यांच्या नावांचा विचार केला गेला नाही. टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त असल्याने बॅडमिंटनचे प्रशिक्षक गोपीचंद यांना समितीत स्थान देण्यात आले नाही. त्यांच्याकडे एआयसीएस बैठकीत भाग घेण्यासाठी वेळ राहणार नसल्याने त्यांना समितीतून वगळण्यात आले आहे. क्रीडा समितीत कुस्तीपटू योगेश्वर दत्त, गिर्यारोहक बचेंद्री पाल, धनुर्धारी लिंबा राम, धावपटू पीटी उषा, नेमबाज अंजली भागवत, पॅरालंपियन दीपा मलिक, रेनेदी सिंग आदींचा समावेश झाला आहे.
समिती सदस्य: लिंबा राम (तिरंदाजी), पीटी उषा (अॅथलेटिक्स), बचेंद्र पाल (पर्वतारोहण), दीपा मलिक (पॅरा-एथलीट), अंजली भागवत (नेमबाज), रणडी सिंग (फुटबॉल) आणि योगेश्वर दत्त (कुस्ती).