IPL Auction 2025 Live

Sachin Tendulkar Hits the Gym: अनलॉक 3 नंतर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने गाठले Gym, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ (Watch Video)

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मास्टर-ब्लास्टर डंबेल्सने व्यायाम करताना, मनात स्ट्रेचिंग करताना दिसत आहे. महाष्ट्रात अनलॉक 3 ची आजपासून सुरुवात झाली आहे. यानुसार राज्यात काही नियमांसह Gym सुरु झाले आहेत.

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने गाठले Gym (Photo Credit: Instagram)

'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखला जाणारा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulakr) 2013 मधून निवृत्त झाला. जगभरातील कोट्यावधी लोकांना प्रेरणा देणारा सचिन आपली तंदुरुस्ती आणि आहारामुळे आपल्या चाहत्यांच्या दृष्टीत देवाच्या पातळीवर पोहोचला. आजही तो निवृत्तीनंतरच्या इतक्या वर्षानंतरही फिटनेसच्या कडक नियमांचे अनुसरण करतो. महाष्ट्रात अनलॉक (Maharashtra Unlock) 3 ची आजपासून सुरुवात झाली आहे. यानुसार राज्यात काही नियमांसह Gym सुरु झाले आहेत. सचिनने नुकतंच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला ज्यात तो जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. सचिनची तुलना विराट कोहलीशी करणे योग्य नाही असे अनेकांचे मत आहे, परंतु जेव्हा फिटनेस आणि आहाराकडे समर्पण करण्याची वेळ येते तेव्हा दोघेही एकमेकांसारखेच आहेत. (IPL 2020: रोहित शर्माला सचिन तेंडुलकर आणि शॉन पोलॅक पुन्हा हवे आहेत मुंबई इंडियन्स संघात, पाहा काय म्हणाला मास्टर-ब्लास्टर See Tweet)

अनलॉक 3 चे औचित्य साधून सचिनने अनेक महिन्यातून पहिल्यांदा जिम गाठले. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मास्टर-ब्लास्टर डंबेल्सने व्यायाम करताना, मनात स्ट्रेचिंग करताना दिसत आहे. तब्बल चार महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आज पासून महाराष्ट्रात जिम सुरु करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्त होऊनही सचिन आपल्या मार्गापासून भटकला नाही आणि फिटनेसच्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अजूनही सक्रिय आणि चिकाटीने काम करत आहे. सचिनचा असा फिटनेस रिजिम पाहून त्याचे चाहतेही चकित होतील हे मात्र नक्की.

पाहा सचिनचा हा फिटनेस व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

🏋🏻‍♀️

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

सचिनचा हा व्हिडिओ केवळ फिटनेस उत्साही व्यक्तींना प्रेरणाच देणार नाही तर अनलॉक 3.0 नंतर जिममध्ये घाम गाळण्याची योजना आखण्यासाठीही मदत करेल. सरकारने अनलॉक 3 मार्गदर्शक सूचना जारी केल्या ज्यानुसार जिम आणि योग संस्था 5 ऑगस्टपासून सुरू राहू शकतील. यापूर्वी बंदी घालण्यात आलेल्या इतर सर्व क्रियाकलापांना अद्यापही प्रतिबंधित ठेवण्यात आले असले तरी रात्रीचे कर्फ्यू देखील रद्द केले गेले आहेत.