Paralympics 2024: मेडल्स मंडे! एका दिवसात 8 पदके जिंकताच Sachin Tendulkar कडून पॅरा-ॲथलीट्सचे अभिनंदन

या पराक्रमाने प्रभावित होऊन सचिन तेंडुलकर याने विजेत्यांचे अभिनंदन केले.

Photo Credit- Instagram

Paralympics 2024: 2020 च्या टोकियो पॅरालिम्पिक गेम्समध्ये, भारताने 19 पदकांसह पॅरालिम्पिक गेम्समध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम पदकतालिका नोंदवली. त्या कामगिरीत सुधारणा राखत, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 15 पदके जिंकली (India at Paris Paralympic)आहेत. या पदकांच्या यादीत आणखी पदके पडण्याची आशा आहे. सोमवारी, 2 सप्टेंबर रोजी भारताच्या पॅरा-ॲथलीट्सनी आठ पदके मिळवून गुणांकनात मोठी वाढ निर्माण केली. सुमित अंतिल आणि नितेश कुमार यांनी आपापल्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकून देशाचा मान वाढवला.(हेही वाचा: Paris Paralympics 2024: रेकॉर्डब्रेकर सुमित अँटीलने बॅक टू बॅक पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले)

सचिन तेंडुलकरने भारतीय पॅरा-ॲथलीट्सचे अभिनंदन केले

इतर खेळांमध्ये सुहास यथीराज, तुलसीमाथी मुरुगेसन आणि योगेश कथुनिया यांनी रौप्यपदक तर नित्या श्री सिवन, मनीषा रामदास आणि शीतल देवी-राकेश कुमार जोडीने कांस्यपदक जिंकले. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar )विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्या दिवसाला ‘मेडल्स मंडे’ असे नाव दिले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif