Asian Games 2023: महाराष्ट्राच्या लेकीची सुवर्ण कामगिरी, आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिसमध्ये जिंकल गोल्ड मेडल

रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकले.

Asian Games 2023 :

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत सातव्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकले. टेनिसमधील हे पहिले सुवर्णपदक होय. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होतोय. सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा देण्यात येता आहे. महाराष्ट्रासाठी कौतुकाची बाब आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरवर पोस्ट शेअर केला आहे. हुशार! महाराष्ट्राच्या कन्येचे खूप खूप अभिनंदन ऋतुजा बोसले आणि रोहन बोपन्ना. टेनिस मिश्र दुहेरी स्पर्धेत (आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ! तिचे कुटुंब, प्रशिक्षक आणि सर्व अधिकाऱ्यांसाठी अभिमानाचा क्षण, वर्षानुवर्षे केलेली मेहनत आणि मेहनत फळाला आली! रुतुजाचे वडील समप्तराव भोसले हे डीवायएसपी आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राच्या गृहविभागासाठी 2 सुवर्णपदके मिळविली आहेत! महाराष्ट्राचे अभिनंदन! अभिनंदन भारत