US Open 2019: रॉजर फेडरर याला पहिल्या सेटमध्ये मात देणाऱ्या सुमित नागल याने मानले विराट कोहली याचे आभार
सुमित नागल याने भारतीय लोकांचे मन जिंकले आहेत. पहिल्या सेटमध्ये फेडरर याला हारवूनदेखील सुमित नागल याला हा सामना गमवावा लागला आहे. सामना संपल्यानंतर सुमित यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) आभार मानले. जर विराट कोहलीने त्याला मदतीचा हात दिला नसता तर, आज तो या येथे नसता. यासाठी विराट कोहलीचे त्याने मनापासून आभारही मानले. सुमित याला विराट कोहली फाऊंडेशन मधून मदत मिळते, याचा खुलासा त्याने केला.
रॉजर फेडरर (Roger Federer) यासारख्या अनुभवी खेळाडूला पहिल्या सेटमध्ये मात करणारा सुमित नागल (Sumit Nagal) एका रात्रीत स्टार झाला आहे. सुमित नागल याने भारतीय लोकांचे मन जिंकले आहेत. पहिल्या सेटमध्ये फेडरर याला हारवूनदेखील सुमित नागल याला हा सामना गमवावा लागला आहे. सामना संपल्यानंतर सुमित यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) आभार मानले. जर विराट कोहलीने त्याला मदतीचा हात दिला नसता तर, आज तो या येथे नसता. यासाठी विराट कोहलीचे त्याने मनापासून आभारही मानले. सुमित याला विराट कोहली फाऊंडेशन मधून मदत मिळते, याचा खुलासा त्याने केला.
सुमित नागल म्हणाला की, जेव्हा तो कठीण परिस्थितीत होता, तेव्हा विराट कोहली फाउंडेशनने (Virat Kohli Foundation) त्याला खूप मदत केली. यामुळे तो येथे पोहोचू शकला आहे. विराट कोहली फाउंडेशन 2017 सालापासून सुमीत नागल याला आर्थिक मदत करीत आहे. सुमीत नागल म्हणाला की, "मी जेव्हा ज्युनिअर होतो, तेव्हा मला जास्त स्पर्धा खेळता येत नव्हत्या, कारण माझ्याकडे इतका पैसा नव्हता. मी भाग्यवान आहे की, मला विराट कोहलीचे सहकार्य लाभले."
हे देखील वाचा- एकाच सामन्यात जसप्रीत बुमरहा, इशांत शर्मा, रिषभ पंत यांची विक्रमाला गवसणी
सुमित नागल बॉम्बे टाईम्सशी बोलताना म्हणाले की, "खेळाडूंच्या मदतीने हा खेळ पुढे नेला जाऊ शकतो. कोहलीची मदत मिळविणे ही माझ्यासाठी बहुमोलाची गोष्ट आहे. जर विराट कोहली फांऊडेशनने माझी मदत केली नसती तर, माझे काय झाले असते," असेही तो म्हणाला.
युएस ओपनमधील पहिल्या सेटमध्ये सुमित नागल याने फेडररचा 6-4 असा पराभाव केला. परंतु यानंतर फेडररने सामन्यात पुनरागमन केले. दुसऱ्या सेटमध्ये सुमिलला 6-1 आणि तिसऱ्या सेटमध्ये 6-2 असे हरवून सामना जिंकला.