Wrestlers Protest: साक्षी मलिकचं मोठं वक्तव्य - जोपर्यंत सर्व प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आशियाई स्पर्धेत सहभागी होणार नाही
अनुराग ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात 15 जूनपर्यंत कोणतेही निदर्शने करणार नसल्याचे सांगितले होते.
कुस्तीपटू साक्षी मलिकने (Sakshi Malik) सांगितले की ती आणि बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्यासह इतर दोन कुस्तीपटू त्यांच्या समस्यांचे निराकरण झाल्यानंतरच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होतील, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. "आम्ही आशियाई क्रीडा स्पर्धेत तेव्हाच सहभागी होऊ जेव्हा या सर्व समस्यांचे निराकरण होईल. आम्ही दररोज मानसिकरित्या कशातून जात आहोत हे तुम्हाला समजू शकत नाही," असे मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, या मुद्द्यावर आज हरियाणातील सोनीपतमध्ये महापंचायत होणार आहे. यावेळी सोनीपत महापंचायतीच्या ठिकाणी पोहोचलेला कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला की, आम्ही सरकारशी केलेली चर्चा आम्ही आमच्यात ठेवू. हे संभाषण आमच्या समर्थनार्थ उभे असलेल्यांसमोर ठेवू, मग ती कोणतीही संघटना असो वा खाप पंचायत.
पाहा व्हिडिओ -
15 जूनपर्यंत प्रदर्शन न करण्याचा निर्णय
याआधी बुधवारी (7 जून) केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना निदर्शनांबाबत चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. अनुराग ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात 15 जूनपर्यंत कोणतेही निदर्शने करणार नसल्याचे सांगितले होते.
15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे आश्वासन सरकारने पैलवानांना दिले. साक्षी मलिक यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, “आम्हाला सांगण्यात आले होते की पोलिस तपास 15 जूनपर्यंत पूर्ण होईल. तोपर्यंत थांबून आंदोलन स्थगित करण्यास सांगितले आहे. ते म्हणाले, "दिल्ली पोलीस 28 मे रोजी पैलवानांवर दाखल केलेला एफआयआरही मागे घेतील."
साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या दोघांनीही सांगितले की त्यांचे आंदोलन अद्याप संपलेले नाही आणि त्यांनी केवळ सरकारच्या विनंतीवरून 15 जूनपर्यंत त्यांचे आंदोलन पुढे ढकलले आहे.