Wrestler Babita Phogat Resigns: कुस्तीपटू बबीता फोगाट यांचा सरकारी नोकरीला रामराम, राजकारणाच्या आखाड्यात करणार पुनरागमन
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबीता फोगाट (Wrestler Babita Phogat) यांनी हरियाणा क्रीडा व युवा व्यवहार विभागाच्या उपसंचालकपदाचा (Deputy Director of Sports and Youth Affairs Department of Haryana) राजीनामा दिला. पदाचा राजीनामा (Wrestler Babita Phogat Resigns) देत सरकारी नोकरीला रामराम ठोकला आहे. आता त्या राजकारणाच्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्याला डाव दाखवणार आहेत. लवकरच त्या भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर हरियाणातील पोटनिवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे. बबीता फोगाट आणि कबड्डीपटू कविता देवी यांना 30 जुलै रोजी हरियाणा क्रीडा विभागात उप निदेशक पदावर नियुक्त करण्यात आले होते.
बबीता फोगाट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 'मी राज्याच्या बडोदा विधानसभा पोटनिवडणूक ऐवजी बिहार विधानसभा निवडणुकीत सहभागी होण्यासाठी जात आहे. ' बबीता फोगाट यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2014 (Commonwealth Games) मध्ये सूवर्णपदक जिंकले होते. त्यांनी विधानसभा निवडणूक 2019 मध्ये दादरी येथून निवडणूक लढवली होती. परंतू त्यात त्यांचा पराभव झाला होता. (हेही वाचा, भाजप नेता, कुस्तीपटू बबीता फोगाट यांच्याकडून पोलीस सेवेततील नोकरीचा राजीनामा)
बबीता फोगाट यांनी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते असलेले आपले वडील महावीर सिंह फोगाट यांच्यासोबत भाजप प्रवेश केला. त्यानंतर एकाच दिवसानंतर 13 ऑगस्ट 2019 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, बबीता फोगाट यांच्या जीवनावर 'दंगल' नावाचा सीनेमाही आला होता. या सीनेमात अभिनेता अमिर खान याने महावीर फोगाट यांची व्यक्तिरेका साकारली होती. हा चित्रपट गीता आणि बबीता या दोन बहिणींच्या आयुष्यावर आधारीत आहे.