Wimbledon 2019: अँडी मरे यांना सन्मानित करण्यासाठी विंबलडन आयोजक बांधणार पुतळा
जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानी असलेला ब्रिटिश टेनिसस्टार अँडी मरे याचा सन्मान करण्याच्या हेतूने ऑल इंग्लंड क्लब तर्फे त्याचा एक पुतळा बांधण्यात येणार आहे.
जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानी असलेला ब्रिटिश टेनिसस्टार अँडी मरे (Andy Murray) याचा सन्मान करण्याच्या हेतूने ऑल इंग्लंड क्लब (All England Club) तर्फे त्याचा एक पुतळा बांधण्यात येणार आहे. ऑल इंग्लंड क्लबचे चेअरमन फिलिप ब्रुक (Philip Brook) यांनी 2-वेळच्या चॅम्पियन मरे यांच्या विषयी त्यांची नवीनतम योजना उघडकीस केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विंबलडन विश्व नंबर 1 चा पुतळा बांधण्याच्या तयारीत आहे. 2013 मध्ये मरे हा विंबलडन ग्रँड स्लॅम जिंकण्यासाठी 77 वर्षांनंतर पहिला ब्रिटिश खेळाडू ठरला. तीन वर्षानंतर त्याने पुन्हा एकदा ही स्पर्धा जिंकली आणि त्यामुळे आता विंबलडनने मरेच्या ऑल इंग्लंड क्लबमध्ये त्याच्या कामगिरीसाठी त्याचा सन्मान करण्याचे ठरवले आहे. (Wimbledon 2019: राफेल नदाल याला पराभूत करून रोजर फेडरर 12 व्या विंबल्डन फाइनलमध्ये, अंतिम फेरीत नोवाक जोकोविच याचे आव्हान)
ब्रूकने म्हणाले की ते मरेसाठी अरे काहीतरी करतील जसे त्यांनी लेफ्टनंट फ्रेड पेरी (Fredy Perry) साठी केले. पेरी यांनी 3 वेळा विंबलडनचे विजेते जिंकले होते. पण त्यांनी असेही म्हटले की खेळाडूच्या सन्मानार्थ त्यांच्यानंतर स्टेडियमचे नामांकन होणार नाही.
ब्रूक म्हणाले, "जे आम्ही पेरीसाठी केले तेच आम्ही मरेसाठी देखील करणार आहोत. टेनिस खेळाडूंच्या नंतर एका स्टेडिअमचे नाव ठेवणासारखे आम्ही काही करू इच्छित नाही. आम्हाला सेन्टर कोर्ट, कोर्ट नंबर १ असेच आवडते. आम्हाला आमच्या परंपरा आवडतात आणि मला वाटते की ही एक परंपरा आहे जी आम्ही टिकून ठेवू इच्छितो."
यंदाच्या जानेवारी महिन्यात मरेने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण आपल्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करून मरे पुन्हा एकदा टेनिसच्या कोर्टवर परतला. त्याने लंडनच्या क्वीन्स क्लब स्पर्धेतून पुनरागमन केले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)