Who Is Avani Lekhara: कोण आहे अवनी लेखरा? वयाच्या 11व्या वर्षी झालेल्या अपघातानंतरही संपूर्ण जगावर उमटवला ठसा; पॅरालिम्पिकमध्ये 2 सुवर्णपदके जिंकून रचला इतिहास
Paris Paralympics 2024: पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवशी भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. भारताच्या अवनी लेखरा (Avani Lekhara) हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एकेरीत सुवर्णपदक पटकावले आहे.
Avani Lekhara Creates History: पॅरिस पॅरालिम्पिक 2024 चा आज दुसरा दिवस () आहे. पहिला दिवस भारतासाठी खूप चांगला गेला. पुरुष आणि महिलांसह एकूण 8 भारतीय बॅडमिंटनपटूंनी त्यांचे पहिले सामने जिंकले. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती आणि तसेच झाले. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवशी भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. भारताच्या अवनी लेखरा (Avani Lekhara) हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एकेरीत सुवर्णपदक पटकावले आहे. (हे देखील वाचा: Manish Narwal Wins Silver Medal: भारताची चमकदार कामगिरी! देशाला मिळाले चौथे पदक, आता मनीष नरवालने नेमबाजीत रौप्यपदक पटकावले)
अवनी लेखाने इतिहास रचला
याआधीही अवनी लेखरा हिने टोकियोमध्ये (2020) सुवर्णपदक जिंकले होते. या स्पर्धेसह अवनी लेखरा हिनेही आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. अवनी लेखरा पॅरालिम्पिक स्पर्धेत सलग दोन सुवर्णपदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
अवनी लेखरा हिचा 2012 मध्ये झाला होता अपघात
अवनी लेखरा ही राजस्थानच्या जयपूरची रहिवासी आहे. अवनी लेखरा हिने कायद्याचे शिक्षण घेतले आहे. अवनी लेखरा साठी 2012 हे वर्ष खूप कठीण होते. एका भीषण कार अपघातात अवनी लेखरा हिला मणक्याचा त्रास झाला. मात्र त्यानंतरही अवनी लेखरा हिने हार मानली नाही आणि तिच्या कमकुवतपणाचे ताकदीत रूपांतर करून संपूर्ण जगावर आपला ठसा उमटवला. या अपघातानंतर अभिनव बिंद्राच्या आत्मचरित्राने अवनी लेखराचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. अवनी लेखरा हिने अभिनव बिंद्राला आपला प्रेरणास्रोत बनवले आणि नेमबाजीचा सराव सुरू केला.
पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवशी भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एकेरीत सुवर्णपदक पटकावले आहे. याशिवाय मोना अग्रवालने भारताला दुसरे पदक मिळवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून अवनी लेखरा हिचे अभिनंदन केले आहे. मोदींनी ट्विट करून सांगितले की भारताने पॅरालिम्पिक 2024 मध्ये आपले पदक खाते उघडले! अवनी लेखरा हिचे R2 महिलांच्या 10M एअर रायफल SH1 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. अवनी लेखरा हिने इतिहास रचला आहे. अवनी लेखरा ही 3 पॅरालिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे! तिचे समर्पण भारताला अभिमानास्पद बनवत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)