Swapnil Kusale Wins Bronze: पॅरिस ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये स्वप्नील कुसळे याने कांस्य पदक जिंकले
नेमबाज स्वप्नील कुसळे याने आज (गुरुवार, 1 ऑगस्ट) नेमबाजी या क्रीडा प्रकारात कांस्य पदक मिळवले. ज्यामुळे भारताची एकूण पदसंख्या तीन इतकी झाली आहे.
स्वप्नील कुसळे (Swapnil Kusale) या 28 वर्षीय भारतीने नेमबाजाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत कांस्य पदक (Bronze Medal) मिळवून भारताचे तिसरे पदक गुरुवारी (1 ऑगस्ट) जिंकले. पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या कुसळे ( Swapnil Kusale Win Bronze Medal)याने एकूण 451.4 गुणांसह पूर्ण केले आणि त्याला वाय.के.ला मागे टाकले. लिऊ आणि सेरहिय कुलिश अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले. कुसळेची कामगिरी लिऊच्या 463.6 आणि कुलिशच्या 461.3 च्या तुलनेत काहीशी कमी होती. शेवटच्या क्षणापर्यंत तो रौप्यपदकासाठी स्पर्धेत होता पण शेवटी त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारताचे नेमबाजीत यश
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीत मिळालेलेहे तिसरे पदक आहे. उल्लेखनीय असे की, तिन्हीही कांस्यपदके आहेत. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकतालिकेची सुरुवात केली. यानंतर तिने सरबज्योत सिंगसोबत सांघिक स्पर्धेत आणखी एक कांस्यपदक जिंकले. (हेही वाचा, Surfing Olympics Google Doodle: सर्फिंग ऑलिम्पिक गूगल डूडल; पाण्यावर तरंगता पक्षी सांगतोय तरी काय?)
एक्स पोस्ट
एका तपानंतर ऐतिहासिक कामगिरी
कुसळेचे यश हे एकाच ऑलिम्पिक आवृत्तीतील नेमबाजीत भारताच्या सर्वाधिक पदकांची संख्या आहे. या आधीची सर्वोत्तम कामगिरी 2012 मध्ये झाली होती. जेव्हा गगन नारंग आणि विजय कुमार यांनी अनुक्रमे कांस्य आणि रौप्यपदक जिंकले होते. यंदाच्या कामगिरीने ऑलिम्पिक नेमबाजीत भारताचा पदकांचा दुष्काळ एका तपानंतर संपला आहे. कुसळेच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स इव्हेंटमधील प्रभावी कामगिरीने भारताच्या पदकतालिकेतच भर पडली नाही तर जागतिक स्तरावर नेमबाजी खेळातील देशाच्या वाढत्या ताकदीवरही प्रकाशझोत पडला आहे.