प्रेक्षक सीटवर सेक्स डॉल बसवल्याबद्दल FC Seoul क्लबवर दक्षिण कोरिया फुटबॉल लीगने ठोठावला विक्रमी 100 मिलियन वोनचा दंड
त्याच्या शिस्त समितीने एफसी सियोलवर विक्रमी 100 करोड वोनचा दंड ठोठावला असल्याचे दक्षिण कोरियाच्या लीगने बुधवारी सांगितले.
कोरोना व्हायरसमुळे बर्याच दिवसांपासून बंद राहिलेले फुटबॉलअखेर दक्षिण कोरियात (South Korea)परतले. दक्षिण कोरियामध्ये फुटबॉल (Football) सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या रिकाम्या जागा भरण्यासाठी प्रेक्षकांच्या आसनांमध्ये सेक्स डॉल (Sex Dolls) बसवल्याबद्दल एका क्लबला रेकॉर्ड दंड ठोठावण्यात आला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात प्रेक्षकांच्या जागांवर पुतळे ठेवण्याऐवजी क्लबने लैंगिक बाहुली लावली होती, कारण त्याच्या शिस्त समितीने एफसी सियोलवर (FC Seoul) विक्रमी 100 करोड वोनचा दंड ठोठावला असल्याचे दक्षिण कोरियाच्या लीगने बुधवारी सांगितले. क्लबने मानवी पुतळ्यासह समर्थकांची प्रचंड गर्दी भरुन आपल्या घरच्या मैदानावर त्यांच्या खेळाडूंना जाणवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु क्लबची हे पाऊल त्या वेळी दुर्दैवी ठरली जेव्हा उपस्थित प्रेक्षकांच्या लक्षात आले की हे पुतळे वास्तविक लैंगिक बाहुल्या आहेत. कोरोनामुळे जगभरात बर्याच ठिकाणी फुटबॉल सामने सुरू झाले आहेत, परंतु प्रेक्षकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. (Coronavirus: ला लीगा क्लबांना एकत्र प्रशिक्षण करण्याची मिळाली परवानगी, एका ग्रुपमध्ये असणार फक्त 10 खेळाडू)
कोरिया प्रोफेशनल फुटबॉल लीगचे सामने कोरोनामुळे बर्याच दिवसांपासून बंद राहिल्यानंतर प्रेक्षकांविना पुन्हा सुरू झाले. लीगने निवेदनात म्हटले की, "क्लबच्या या कृत्याने महिला चाहत्यांसह त्यांच्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या आहेत. अशा प्रकारची कृती सहन केली जाऊ शकत नाही आणि अशी घटना रोखण्यासाठी क्लबला दंड ठोठावण्यात आला आहे." या क्लबने सोमवारी या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, परंतु ते म्हणाले की, त्यांनी लावलेले पुतळे सेक्स डॉल्स होते हे त्यांना माहित नव्हते. एफसी सियोलने इन्स्टाग्रामवर दिलेल्या निवेदनात म्हटले की,
“आम्ही आमच्या चाहत्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आम्हाला फार दुःख आहे. या कठीण काळात स्थिती हलकं करण्यासाठी काहीतरी करण्याचा आमचा हेतू होता. अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत म्हणून आपण काय करण्याची गरज आहे यावर आम्ही पूर्ण विचार करू.”
सियोल एफसी आणि ग्वांगझू एफसीमधील सामन्यादरम्यान प्रेक्षकांऐवजी गॅलरीमध्ये कटआउट आणि पुठ्ठ्याने बनविलेले पुतळे ठेवण्यात आले होते. तसेच, चाहत्यांनी तयार केलेल्या वातावरणाची भरपाई करण्यासाठी स्टेडियमच्या संगीतही वाजवण्यात आले. स्टेडियममधील व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये संघातील खेळाडूंच्या कट-आउटसमोर, किमान 10 सेक्स डॉल्स आसनावर बसलेल्या दिसल्या.