Pro Kabaddi League 2019: Tamil Thalaivas संघाचा पराभव तर Patna Pirates चा 1 गुणाने विजय

तर कबड्डीचा खेळ प्रेक्षकांच्या पसंदीस पडत असून त्याचे चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे.

Pro Kabaddi Season 7

प्रो कबड्डी लीग सीजन 7 ला गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. तर कबड्डीचा खेळ प्रेक्षकांच्या पसंदीस पडत असून त्याचे चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. तर आजचा सामना तमिळ थलाइव्हा (Tamil Thalaivas)  विरुद्ध पटना पायरट्स (Patna Pirates) यांच्यामध्ये खेळवण्यात आला. आजचा सामना मुंबईमधील सरदार वल्लभ भाई पटेल इंडोर स्टेडिअमवर खेळवण्यात आला.

या सामन्यात दोन्ही संघाने उत्तम कामगिरी केली असून पटना संघातील खेळाडू जयदीप याने विरुद्ध संघासोबत 5 वेळा टॅकल करत 7 गुण त्याने एकट्याने पटकावले आहेत. तसेच मोनू यानेसुद्धा 3 वेळा समोरच्या संघासोबत भिडत एकट्याने 5 गुण संघाला मिळून दिले. पटनाच्या संघाने तमिळ थलाइव्हा यांच्यावर मात करत 24-23 अशा गुणांनी विजय मिळवला आहे.(Pro Kabaddi League 2019: स्वतःच्या मातीत मुंबईचा पराभव; U Mumba वर Bengaluru Bulls चा 4 गुणांनी विजय)

तर तमिळ थलाइव्हा संघाचा 1 गुणाने पराभव झाला आहे. मात्र या संघातील खेळाडूंनीसुद्धा उत्तम खेळण्याचा प्रयत्न केला. तसेच राहुल चौधरी याने 5 रेड मध्ये 5 गुण मिळवले आणि मनजित चिल्लर याने 4 वेळा समोरच्या संघासोबत टॅकल करत 4 गुण मिळवले. परंतु तरीही अजित, अजय ठाकूर आणि रान सिंग यांनीसुद्धा उत्तम खेळी करण्याचा प्रयत्न केला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif