Pro Kabaddi League 2019: Bengal Warriors चा 43 गुणां नी Puneri Paltan वर दणदणीत विजय, मनिंदर सिंग याची सामन्यावेळी दमदार खेळी

या दोन्ही संघात लढत पाहण्यासारखी होती.

Pro Kabaddi League 2019 (Photo Credits-Twitter)

प्रो कबड्डी लीग सीजन 7 मधील आजच्या पहिल्या वेळेस खेळवण्यात आलेल्या संघामध्ये पटना पायरट्स यांचा पराभव करत तमिळ थलाइव्हा संघाने 1 गुणाने विजय मिळवला. तर दुसऱ्या वेळी बंगाल वॉरिअर्स (Bengal Warriors) विरुद्ध पुणेरी पलटन (Puneri Paltan) यांच्यामध्ये सामना रंगला. या दोन्ही संघात लढत पाहण्यासारखी होती. परंतु तरीही बंगालच्या संघातील खेळाडूंनी विरुद्ध संघाला टॅकल करत दणदणीत विजय मिळवला.

मुंबईतील सरदार वल्लभ भाई पटेल इंडोर स्टेडिअमवर आज 8.30 वाजता बंगाल वॉरिअर्स विरुद्ध पुणेरी पलटन यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. दरम्यान बंगालच्या संघामधील मनिंदर सिंग याने 13 रेड आणि 1 बोनस पॉइंट मिळवत एकट्याने 14 गुण संघाला मिळवून दिले. तसेच इस्माइल नाबिक्ष यानेसुद्धा दमदार खेळी करत 8 गुण मिळवले. रिंकू नरवाल, विराज लांडगे आणि बलदेव सिंग यांची सुद्धा खेळी उत्तम राहिली.(Pro Kabaddi League 2019: Tamil Thalaivas संघाचा पराभव तर Patna Pirates चा 1 गुणाने विजय)

तर पुणेरी पलटन संघाने बंगाल वॉरिअर्स विरुद्ध 13 गुण प्राप्त करत पराभव स्विकारला. मात्र संघातील खेळाडू पंकज मोहिते याने 6 रेड टाकत 6 गुण मिळवले. तर सुशांत सेल, अमित कुमार आणि जाधव शहाजी यांनी संघाला प्रत्येकी 3-3 गुण मिळवून दिले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif