Pro Kabaddi 2019: हरियाणा स्टीलर्सचा पुणेरी पल्टनवर एकतर्फी विजय, गुणतालिकेत मिळवले दुसरे स्थान

बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सच्या विकास कंडोला याने सर्वाधिक 11 गुण मिळवून संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

हरियाणा स्टीलर्स आणि पुणेरी पल्टन (Photo Credit: @ProKabaddi/Twitter)

प्रो कबड्डी (Pro Kabaddi) 2019 च्या 71 व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स (Haryana Steelers) संघाने पुणेरी पल्टन (Puneri Paltan) संघाचा 41-27 ने पराभूत करून आठवा विजय नोंदविला आणि गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सच्या विकास कंडोला याने सर्वाधिक 11 गुण मिळवून संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. बचावामध्ये हरियाणा स्टीलर्सचा कर्णधार धर्मराज चेरलाथन याने हाई 5 पूर्ण केला. पुणेरी पल्टनचा हा 12 सामन्यांमधील सातवा पराभव असून पॉइंट टेबलमध्ये अद्याप दहाव्या क्रमांकावर आहे. पुणेने पहिल्या हाल्फमध्ये चांगली सुरुवात केली आणि एका वेळी 9-6 अशी आघाडी घेतली, पण त्यानंतर हरियाणाने शानदार पुनरागमन केले आणि त्यानंतर पुणे संघ सामन्यात पुनरागमन करू शकला नाही.

पहिल्या हाल्फनंतर हरियाणा स्टीलर्सने 18-11 अशी आघाडी घेतली. पहिल्या हाफच्या शेवटी पुनेरी पलटणचा संघ ऑलआऊट झाला. दुसऱ्या हाल्फमध्ये देखील हरियाणाने पुनेरी पल्टनला पुनरागमन करू दिले नाही आणि विकासने आणखी एक सुपर 10 पूर्ण केला. दुसर्‍या हाफमध्ये विकास कंडोलाच्या सुपर 10 नंतर पुनेरी पल्टन पुन्हा एकदा ऑल आऊट झाला आणि मॅचमधून त्याला एक गुण मिळण्याची आशादेखील संपली.

विकास कंदोलाशिवाय विनयने हरियाणा स्टीलर्सकडून कर्णधार धर्मराज चेरलाथनने डिफेन्समध्ये पाच आणि विनयने पाच गुण मिळवले. पुणेसाठी नितीन तोमर याने आठ गुणांसह चांगली कामगिरी केली, परंतु त्याला संघाला एकतर्फी पराभवापासून वाचविता आले नाही. नितीन व्यतिरिक्त पंकज मोहिते यांनीही सात गुण घेतले पण आज संघाचा डिफेन्स खूप कमकुवत झाला ज्यामुळे संघाला एकतर्फी पराभव पत्करावा लागला. केवळ सुरजित सिंगच हाई 5 पूर्ण करू शकला. दरम्यान, हरियाणाचा पुढील सामना 7 सप्टेंबरला कोलकातामध्ये दबंग दिल्लीशी होईल, तर पुणे संघाचा पुढील सामना 5 सप्टेंबरला बेंगळुरू येथे यू मुम्बाशी होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif