Common Wealth Games 2022 च्या विजेत्यांबरोबर पंतप्रधान मोदींचा विशेष संवाद, पाहा खास व्हिडीओ

CWG मध्ये ऐतिहासिक कामगिरीबाबत पंतप्रधानांनी सगळ्या खेळाडूंचं मोठं कौतुक केलं.

PM Narendra Modi (PC - ANI)

आज Common Wealth Games 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी विशेष संवाद साधला आहे. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक (Nisith Pramanik) हे देखील उपस्थित होते. उपस्थित असलेल्या सगळ्या खेळाडूची पंतप्रधानांनी खास आभार मानले. तसेच तुमचा वेळ काढून तुम्ही मला भेटायाला आले या गोष्टीचा मला आनंद आहे कारण इतर भारतीय नागरिकांना प्रमाणे मी देखील तुम्हाला भेटण्यास उत्सुक होतो असं पंतप्रधान मोदी म्हणाले. CWG मध्ये ऐतिहासिक कामगिरीबाबत पंतप्रधानांनी सगळ्या खेळाडूंचं मोठं कौतुक केलं.

 

तसेच यावर्षी प्रथमच देशात पार पडलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड बाबबत देखील प्रतिक्रीया दिली. देशाने केवळ यशस्वीरित्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड आयोजन केले नाही तर बुद्धिबळातील आपली समृद्ध परंपरा पुढे चालू ठेवत आपली सर्वोत्तम कामगिरी केली. CWG मध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे आणि बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये (Chess Olympiad) पदक जिंकणाऱ्या सर्वांचे पंतप्रधानांनी खास अभिनंदन केले. यावर्षी भारताने एकूण 61 पदकांची कमाई केली असली पुढील वेळी आपण सगळे मिळून आपल्या प्रयत्नांच्या जोरावर पदकांची संख्या वाढवू असं मोदी म्हणाले. (हे ही वाचा:- Urvashi Rautela आणि Rishabh Pant च्या भांडणावर नेटकऱ्यांनी घेतली मजा, Social Media वर मजेदार Memes चा पाउस)

 

पंतप्रधान मोदींकडून CWG मधील महिला खेळाडूंचं विशेष कौतुक करण्यात आलं. कारण यावेळी CWG मध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत महिला खेळाडूंनी देखील भारताच्या नावी अनेक पदक नोंदवली. पी. व्ही सिंधू (P V Sindhu) सारख्या अनुभवी खेळाडूने भारताला ऐकीरी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करुन दिली. पंतप्रधान मोदी कायमच खेळ-क्रिडा या बाबतीत युवा भारताला प्रेरणा देताना दिसतात. आजही स्वतच्या भाषणातून पंतप्रधान मोदी भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढवताना दिसले.